क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

: (संजय महाजन)
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. हरिभाऊ कुलकर्णी, श्रीमती अनुजा गोसावी आणि श्रीमती वैजयंती जगताप उपस्थित होत्या.
श्री. सुभाष क्षीरसागर आणि श्रीमती वैजयंती जगताप यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी तसेच स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री. सोमनाथ ढुमणे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. योगेश कोठावदे यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. संजय पालवे, श्री. ज्ञानेश्वर बुरांडे, सर्व शिक्षक वृंद आणि सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.