अत्याचार करून त्याने अल्पवयीन तरुणीची दगडाने ठेचून केली हत्या, आरोपीला केले गजाआड

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
दारूच्या नशेत त्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा अत्याचार केला त्यानंतर दारूच्या नशेतच तिच्या डोक्यात दगड घालुन तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी त्या तरुणाला गजाआड केले आहे संगमनेर तालुक्यातील ही घटना आहे
दि. २४/०९/२०२३ रोजी दुपारी ०४.००वा.चे पुर्वी चंदनापुरी जुना घाट ता. संगमनेर या ठिकाणी ही घटना घडली असुन फिर्यादी राजेंद्र फकिरा कदम वय-७० वर्षे धंदा-व्यवसाय रा.ममदापुर ता.राहाता सध्या रा. ज्ञानमाता शाळेसमोर, नगर रोड, संगमनेर यांनी फिर्याद दिली त्यांची पिंडित अल्पवयीन मुलगी हिस दि. २४/०९/२०२३ रोजी दुपारी ०४.०० वा.चे पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता तीचे डोक्यात दगड घालुन तिचा |चेहरा ओळखला जावु नये, याकरिता विद्रुप करुन खुन केला आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल आहे.
पोलीस स्टेशन.ता. संगमनेर जि. अहमदनगर
भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे दि.२७/०९/२०२३ नमुद गुन्हा घडल्यानंतर श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी गुन्हा उघडकीस आणणे करीता सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हा उघड करणे कामी संगमनेर शहर पो.स्टे. चे एक पथक, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे एक पथक असे एकुण ०३ पथक आरोपी शोधकामी रवाना झाल्या होत्या. दाखल गुन्हयांच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संगमनेर शहर व तालुका परिसरांत फिरुन आरोपीबाबत माहिती घेऊन तपास करत असताना श्री. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा आरोपी तुषार विठठल वाळुंज याने केला असुन तो आता गेल्यास त्याचे राहते घरी मिळुन येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली
त्यांचे पथकांतील पोलीस अंमलदार पो.ना./ राहुल डोके, पो.कॉ./ राहुल सारबंदे व संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हे अन्वेषण पथकांतील पोलीस अंमलदार पो.ना/गवळी, पो.कॉ. कुऱ्हे, पो.कॉ.शिरसाठ यांना कळवुन तात्काळ ताब्यात घेणे बाबत आदेशित केले
पथकांतील पोलीस अंमलदार यांनी सदर आरोपीतांस त्यांचे राहते घर लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी ता. संगमनेर येथुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करता आरोपी व मयत यांचे मध्ये पुर्वीपासुन मैत्री होती, असे सांगुन दुसऱ्या दोन संशयितांचे नावे सांगुन त्यांनीच मर्डर केल्याचे सांगितले. त्यानुसार त्या दोघाही संशयितांना ताब्यात घेतले. त्याची बारकाईने विचारपुस केली.CCTV पाहिले असता त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा संगमनेर शहरांतील CCTV चेक करणेकामी ०३ पथक रवाना केले असता एके ठिकाणी पिडीत मुलगी, आरोपी सोबत घटना दिवशी दिसुन आली. त्यावरुन बारकाईने विचारपुस करता आरोपीने गुन्हयाची कबुली दिली.
त्यानुसार मंगळवार दि.१९/०९/२०२३ रोजी आरोपी तुषार विठठल वाळुज वय २५ वर्षे रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी ता. संगमनेर याने मयत मुलीस दारु पाजुन जुने चंदनापुरी घाट येथील गणपती मंदिराजवळ ता.संगमनेर येथे नेऊन तिस डोंगराचे वर चला असे म्हणला असता मयताने त्यास विरोध केला असता त्याने मयतास मारहाण केली. त्यानंतर आरोपी हा मयत मुलीस बळजबरीने डोंगराचे वर घेऊन जाऊन तिचे डोक्यात दगड घालुन तिस जिवे ठार मारले आहे. श्री. शलमोन सातपुते, पोलीस उपनिरीक्षक नेम.- संगमनेर तालुका पोलीस स्टेशन श्री. गोरे, पोलीस उपनिरीक्षक नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अह पोकों/३९४ सारबंदे, पोना/डोके, नेम-उपविभागीय पो. अधिकारी कार्यालय, संगमनेर पो.ना./गवळी,पो.कॉ./ शिरसाठ, पो.कॉ./कुऱ्हे नेमणुक-संगमनेर शहर पोलीस स्टेशन
सदर गुन्हयांचे तपासकामी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. सोमनाथ वाघचौरे
उप विभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांनी मार्गदर्शन केले
गुन्हयांचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे.