इतर

वीज कंत्राटी कामगारांना 20,000 रु पगार वाढीची मागणी

पुणे प्रतिनिधी

वीज कंत्राटी कामगारांना 20,000 रु पगार वाढीची मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यातील महावितरण , महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षे काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे . अथवा समान काम समान वेतन किंवा कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात यावी.

या बाबत धोरणात्मक निर्णय घेई पर्यंत या कामगारांना 20,000 रुपये प्रतिमाहे सध्या मिळणारे पगारात पगारवाढ करावी,कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने,मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, मोबाईल व पेट्रोल भत्ता, ओव्हर टाईम,जादा सुट्या मिळाव्या अशा अनेक कामगार हिताच्या व पगार वाढ मागण्यांचा प्रस्ताव वीज कंपनीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यां पदाधिकारी यांनी सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सादर केला आहे. या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष निलेश खरात, कार्याध्यक्ष अमर लोहार, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, उपसरचिणीस राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, निवासी सचिव सुनील कांबळे, सविता येळवे, गीता रणधीर, पल्लवी सुखदेव, व महावितरण कंपनी अध्यक्ष मा लोकेश चंद्र , महानिर्मीती कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक अनबलगन, महापारेपण कंपनी चे मानव संसाधन मा सुमीत गमरे, , महावितरण चे संचालक विक्त मा दिघे, मानव संचालक मा अरविंद भादीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री संजय ढोके, या मान्यवरांनी मागणी पत्र स्विकारले.
मागील कराराच्या वेळेस मुळ वेतनात केवळ 20% ,पगार वाढ मिळाली होती आता 1 एप्रिल 2023 पासून 2028 पर्यत नवा करार होईल,मा . ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासन यावेळी देखील सहानुभूती पूर्वक या मागण्याचा विचार करेल असा विश्वास महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button