शेवगाव तालुक्यातील विवाहितेची नेवासा तालुक्यात आत्महत्या!

सासरच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार
दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील विवाहितेने नेवासा तालुक्यात माहेरी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली

दिनांक 20 जून 2022 रोजी ही घटना घडली .
याबाबतची फिर्याद मयत विवाहितेची आई अर्चना नानासाहेब कर्डिले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे.
मयत मुलीचा विवाह 24.4.2022 रोजी सुधीर सुरेश कापरे (राहणार सामनगाव तालुका शेवगाव ) यांच्याशी झाला होता. ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात सुधीर कापरे यांना पाच लाख रुपये, सहा तोळे सोन्याचे दागिने दिले होते.हुंड्याचे राहिलेले 1,75,000 रुपये सोनाराचे पैसे व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे दिले नाहीत म्हणून सदर मुलीचा शारीरिक व मानसिक छळ खूप दिवसापासून केला जात होता. तसेच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.
या सर्व त्रासाला कंटाळून तिने माहेरी येऊन विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
नेवासा पोलीस ठाण्यात सासु मुक्ताबाई कापरे, सासरा सुरेश कापरे, नवरा सुधीर कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.आहे तर
मयत अर्चना च्या माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी अर्चना च्या सासरी घरासमोरच तिचा अंत्यविधी केला
