इतर
कर्नाटक च्या विजयाने जिल्हा काँग्रेस ने साजरा केला जल्लोष!

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
कर्नाटक मध्ये काँग्रेसने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार लहुजी कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश प्रतिनिधी डाॅ. जयश्रीताई थोरात, उत्कर्षाताई रूपवते, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यासह सर्व फ्रटंलचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
