माका येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात स्नेहमेळावा!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
माका विद्यालयाच्या एस.एस.सी. मार्च 2005 च्या बॅचने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्नेह मेळावा आयोजित केला, या मेळाव्यासाठी 2005 च्या एस एस सी चे 40 विद्यार्थी उपस्थित होते, हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झाले असून आपल्या शाळेविषयी कृतज्ञ आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली, त्यामुळे शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यासाठी त्यांना अध्यापन करणारे शिक्षक विद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. आर. सोनवणे सर,पर्यवेक्षक श्री.बी.पी. काळे सर, गणित शिक्षक श्री. भुजबळ एच.बी. सर व ज्येष्ठ अध्यापक श्री आर. बी.फुलमाळी सर हे उपस्थित होते
विद्यालयाचे प्राचार्य श्री. सोनवणे सरांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी अर्चना काळे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम आपली ओळख करून दिली व आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत याचा परिचय करून दिला, तसेच त्यांच्या शालेय जीवनामध्ये शाळेविषयी त्यांच्या मनामध्ये ज्या रम्य आठवणी होत्या त्या या क्षणी त्यांनी मेळाव्यामध्ये शेअर केल्या. अतिशय सुंदर व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. विद्यालयाच्या विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी व शाळेविषयी आपण कृतज्ञ आहोत या भावनेने या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे रु.10000/-चा निधी विद्यालयाच्या प्राचार्य कडे सुपूर्द केला.यावेळी त्यांना अतिशय आनंद वाटला कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते, सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व यशस्वीपणे कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी – श्रीकांत घुले, आदिनाथ धनवटे, राघूजी रूपनर, सुयोग आव्हाड, अमोल घुले, स्वाती म्हस्के, रूपाली भुजबळ. आदींनी परिश्रम घेतले