आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१५/०५/२०२३

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४५
दिनांक = १५/०५/२०२३
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
काहीना प्रवास घडून येईल. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू सांभाळा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. महत्त्वाच्या कामात किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील. मनात काळजीचे विचार राहतील.
वृषभ
महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मात्र मनात काही शंका असतील. कुणाला मदत करताना लोकांना पारखून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र जपून व्यवहार करणे आवश्यक आहे. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो.
मिथुन
कार्यक्षेत्रात सतत कार्यरत राहावे लागेल. नवीन बदल होतील. नवीन ओळखी होतील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरी अचानक पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क
भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. मनात काही शंका-कुशंका असतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा पुढाकार राहील. मात्र काही लोक तुमच्या माघारी तुमची निंदा करतील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सरकारी कामे मार्गी लागतील.
सिंह
महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. काही ना काही कारणाने कामात विलंब होईल. प्रवास शक्यतो टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. रहदारीचे नियम पाळा. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल.
कन्या
तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. सफलता मिळेल. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने सावध राहा. विवाहेच्छूनी स्थळाची नीट माहिती घेतली पाहिजे.
तूळ
विरोधकांच्या त्यांच्या गोड बोलण्याला फसू नका. मित्राच्या संगतीत वाहवत जाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात काही अडचणी येतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. काहीना मानसन्मान मिळेल.
वृश्चिक
महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या मनात काय आहे हे लक्षात घ्या. काहींना प्रवासाचे योग येईल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल.
धनू
कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. तुमच्या समोरील प्रस्ताव नीट समजून घेऊन मगच स्वीकारा. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमात व्यस्त राहाल. नातेवाईक, घरातील सदस्याशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कामाचा ताण राहील.
मकर
व्यवसायात विक्री चांगली होईल. सतत कार्यरत राहाल. हाती पैसा खेळता राहील. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. जवळच्या सहलीला जाऊन वाल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या.
कुंभ
कामात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात थोडे सावधपणे पावले उचलली पाहिजेत. आर्थिक आवक चांगली राहील. देवाण घेवाणीचे व्यवहार सावधपणे करा. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.
मीन
मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्च करण्याकडे कल राहील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. मुलांचे कौतुक होईल. कुणी तुम्हाला मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४५
दिनांक :- १५/०५/२०२३,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५४,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २५:०४,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति ०९:०८,
योग :- विष्कंभ समाप्ति २५:२९,
करण :- बव समाप्ति १३:५३,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- मेष(११:४४नं. वृषभ) – कृत्तिका,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- रवि – वृषभ ११:४४,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:३४ ते ०९:११ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५७ ते ०७:३४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:४९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४० ते ०५:१७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१७ ते ०६:५४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
अपराध एकादशी, रवि वृषभ ११:४४, पुण्यकाल सूर्योदय ते ११:४४ मु. ४५ समर्घ, अगस्ती लोप, दग्ध २५:०४ प.,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸