आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१६/०५/२०२३

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २६ शके १९४५
दिनांक :- १६/०५/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५५,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २३:३७,
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति ०८:१५,
योग :- प्रीति समाप्ति २३:१५,
करण :- कौलव समाप्ति १२:१८,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४० ते ०५:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४० ते ०५:१७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
तिथिवासर ०६:४२ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २६ शके १९४५
दिनांक = १६/०५/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.
वृषभ
तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात.
मिथुन
बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही.
कर्क
भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर रहा. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते.
सिंह
आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कंटाळा येईल, याला कदाचित तुमचा आळशीपणा कारणीभूत असेल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल.
कन्या
आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचा विश्वास तुमचे व्यावसायिक जीवनावर परिणाम करील. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देणे आणि त्यांची मदत घेणे शक्य होईल. महत्त्वाच्या व्यावसायिक करारांना अंतिम स्वरुप देण्याच्या कामी प्रगतीच्या दिशेन वाटचाल होण्यासाठी शुभ दिवस. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.
तुला
तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.
वृश्चिक
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्या कुटुंबातील सदस्या राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस.
धनु
अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. अर्थविषयक अनिश्चिततेमुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होईल. कार्यालयातील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका. त्याने आपल्या कुटुंबाच्या सुखाला धक्का बसू शकतो. कार्यालयातील प्रश्न कार्यालयातच सोडविणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून घरी कौटुंबिक सुखाचा आनंद घेता येईल. अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल.
मकर
महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आज तुम्ही नवीन प्रकल्प हाती घ्याल ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबात समृद्धी येईल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा.
कुंभ
तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वत:ला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. आज तुम्हाला दिलेली प्रत्येक सूचना तुम्ही टीका म्हणून घ्याल, जी तुमचा मूड घालवेल.
मीन
आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. तुमच्याकडे नेतृत्वगुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे – तुमच्या मनातील ख-या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मने जिंकून घ्याल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर