आजचे पंचांग व राशिभविष्य दि ३०/०१/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १० शके १९४३
दिनांक :- ३०/०१/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२१,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १७:२९,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २४:२३,
योग :- हर्षण समाप्ति १४:१५,
करण :- विष्टि समाप्ति २७:५४,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मकर – श्रवण,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:५६ ते ०६:२१० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:५३ ते ११:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:१८ ते १२:४३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५६ ते ०६:२१ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
शिवरात्रि, भद्रा १७:२९ नं. २७:५४ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १० शके १९४३
दिनांक = ३०/०१/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
योग्यप्रकारे आकलन करू शकाल. आपले विचार तरलपणे मांडाल. जुगाराची आवड पूर्ण केली जाईल. मुलांच्या सहवासात रमाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.
वृषभ
तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे. तुमचा रुबाब राहील. काहीवेळा माघार घ्यावी लागेल. शिस्तीचा बडगा करू नका.
मिथुन
मजेत प्रवास कराल. हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल. गंभीरपणे विचार कराल. वैचारिक प्रौढता दाखवाल.
कर्क
आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. गोड बोलण्यावर भर द्याल. दिवस घरातील कामात व्यतीत होईल. जोडीदाराचा विचार जाणून घ्याल.
सिंह
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. सर्वांशी आदराने वागाल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. भावनाशीलतेने विचार कराल. जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल.
कन्या
लिखाणात मन रमवाल. बुद्धीवादी विचार कराल. तुमच्यातील धाडस वाढेल. स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.
तूळ
आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा. अधिकारात वाढ संभवते. तिखट पदार्थ चाखाल.
वृश्चिक
ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील.
धनु
नातलग भेटतील. इतरांचे कौतुक कराल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल.
मकर
गायन कलेला चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. महिला दागदागिने खरेदी करतील. सामाजिक कार्यात हातभार लावाल. सर्वांशी गोडीने वागाल.
कुंभ
फॅशनची हौस पूर्ण करता येईल. प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. चांगले विवाह सुख लाभेल.
मीन
प्रवासात काळजी घ्यावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील. वरिष्ठांची मर्जी राखावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर