वैवाहिक जीवनाची ‘ यशस्वी’ वाटचाल करणा-यांचा ”विवाह महोत्सवम”

.
‘
सोलापूर : आज अनेक समाजात ‘घटस्फोटाचे’ प्रमाण वाढले आहे. ‘क्षुल्लक’ कारणाने आणि ‘सांमजस्यपणा’ नसल्याने घटस्फोट घेण्याचे निर्णय बळावत आहे. तसेच ‘शंका’, ‘मी पणा’, ‘पाश्चात्य संस्कृती’ यासह अनेक कारणांनी नवविवाहित जोडपे वर्ष – दोन वर्षातच घटस्फोट घेण्याचे ‘स्वतंत्रपणे’ निर्णय घेण्यापर्यंत धाडस करत आहेत. आजच्या जमान्यात मुलगा आणि मुलगी ‘कमावता’ झाल्याने दोन्हीकडचे आईवडीलही शांत व हतबल होऊन बसतात. काही नातेवाईकही या घटनांना फूस लावल्याचे दिसून येते. आज जरी दोघेही कमावता झाल्याने वृध्दापकाळात एकमेकांना आधाराची फारच आवश्यकता असते. किमान त्याबाबतीत विचार करणे फार हितावह आहे. पती – पत्नी म्हणजे मोटारसायकलचे दोन चाकेच. यामध्ये एक जरी चाक निसटून किंवा अन्य कारणांनी पडल्यास मोटारसायकलचे ‘महत्व’ संपतोच. लवकरच दुरुस्ती केल्याने ‘पूर्ववत’ चालतो, तसाच प्रकार पती – पत्नीतील संसार आहे. सध्याची काळाची अत्यंत गरज बनली आहे, ते म्हणजे ‘विवाह संस्कार’ समजून सांगण्याची. सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सप्तपदी यांच्या संयुक्त विद्यमाने वैवाहिक जीवनाची ५० वर्षापेक्षा जास्त झालेल्या नऊ जोडप्यांचा ‘विवाह महोत्सवम’ सोमवार, दि.२९ मे रोजी गोरज मुहूर्तावर करण्यात येत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वर्ष – दोन वर्षात झालेल्या संसार वेलीतील मुलांचे भवितव्य काय.? ते मोठे झाल्यावर कोणाचे अनुकरण करतील.? आज प्रत्येक समाजात ‘बालसंस्कार’ घेण्याबरोबरच ‘विवाह संस्कार’ घेण्याची आवश्यकता असून याचबरोबर ‘भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ’ हेही समजून सांगण्याची गरज बनली आहे. ‘नवविवाहितांना प्रेरणा’ मिळावी या उद्देशाने वैवाहिक जीवनाची पन्नास वर्षे पूर्ण करुन अविरतपणे यशस्वी वाटचाल करणा-या ९ जोडप्यांचा ‘विवाह महोत्सवम’ ‘सोमवार दि. २९ मे’ रोजी संध्याकाळी ६ . ४९ वाजता ह्या ‘गोरज मुहूर्तावर’ पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे आयोजन केले आहे.
संकल्पना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा करण्यात येत असून ह्या विवाह महोत्सवाला नवविवाहित दाम्पत्यांसह राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बंधू – भगिनी, समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, समस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘अक्षतारुपी शुभेच्छा’ द्यावेत, असे आवाहन ‘पद्मशाली सप्तपदी’चे अध्यक्ष सुधीर सोमा, फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी आणि वैकुंठम् म. जडल यांनी केले आहे.