अहमदनगरइतर

महात्मा फुले बाल संगोपन केंद्राच्या वतीने सोनई पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन साजरे.

सोनई प्रतिनिधी

:- महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव येथील विद्यार्थिनींनी आज आमचे औक्षण केले. आम्हाला राख्या बांधल्या. पेढा भरविला. त्यामुळे आम्हाला आमच्या घरीच आज रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा आनंद मिळाला. अशा शब्दात सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बाल संगोपन केंद्र, घोडेगावच्या वतीने सोनई व शनि शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष काशिनाथ चौघुले, सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी, ठाणे अंमलदार विशाल थोरात, पोलीस नाईक नानासाहेब तुपे, पोलीस कॉन्स्टेबल रविकांत गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव झिने, रामदास तमनर, आदिनाथ मुळे, सचिन सांगळे, विकास बोर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना स.पो.नि. चौधरी म्हणाले की, आज सगळीकडे रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व भाऊ बहिणींची लगबग सुरू आहे. आम्हाला मात्र गुन्ह्यांची नोंद करायची, तपास करायचा, आरोपी पकडायचे, कोर्टात हजर करायचे अशी अनेक कामे असतात. त्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. सण साजरे करू शकत नाही, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मात्र अशा परिस्थितीत महात्मा फुले बाल संगोपन केंद्राच्या आमच्या छोट्या बहिणी सोनई पोलीस स्टेशनला आल्या आणि पोलीस स्टेशन मध्येच आम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा केला त्याचे आम्हाला खूप समाधान वाटते.

यावेळी बोलतांना महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संचालक काशिनाथ चौगुले म्हणाले की, सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून आज आम्ही सोनई व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला आलो. भावा बहिणींच्या नात्यातील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये रक्षा बंधनाचा सण साजरा करायचा ठरविले. आणि आमच्या नियोजनानुसार छान कार्यक्रम झाला.त्याचे मला, माझ्या संस्थेला, संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनस्वी आनंद झाला आहे.

यावेळी सोनई पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने महात्मा फुले बाल संगोपन केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनींना स्कूल बॅग, चप्पल व मिठाईचे वाटप करण्यात आले. काशिनाथ चौघुले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सागर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी मंगल पिसे, सुनिता ठोंबरे, निकिता ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगल पिसे, सुनिता ठोंबरे, सुशील साळवे, रवींद्र चौगुले, किसन शिंदे, अनिल शिंदे, सुदाम शेगर आदींनी परिश्रम घेतले.

महात्मा फुले बाल संगोपन केंद्र, घोडेगावच्या वतीने सोनई पोलीस स्टेशन मध्ये आयोजित रक्षाबंधनाचा कार्यक्रमात महात्मा फुले बाल संगोपन केंद्राच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या दप्तराचे वाटप करतांना स.पो.नि. माणिक चौधरी व इतर उपस्थित पोलीस बांधव व काशिनाथ चौघुले व इतर.
(छाया :- विजय खंडागळे, सोनई )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button