इतर

मुक्त विद्यापीठाचे संतोष साबळे यांना पीएचडी

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दृक-श्राव्य केंद्रातील संतोष शिवाजी साबळे यांना नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली. 

‘महाराष्ट्रातील विद्यापीठांचा शैक्षणिक जनसंपर्क : एक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. वि. ल. धारूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. सुधीर भटकर लाभले. तसेच डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचे मार्गदर्शन मिळाले. श्री. साबळे यांनी यापूर्वी अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. तसेच मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्ज अधिकारी म्हणूनही अनेक वर्षे कामकाज पाहिले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शैक्षणिक परिषदांत संशोधन पेपर सादर करुन आपला सहभाग नोंदवला आहे. इयत्ता पाचवीच्या सावरपाडा एक्सप्रेस – कविता राऊत या पाठाचे ते लेखक आहेत. 

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र. कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ. संजीवनी महाले, डॉ. दिनकर माने, नियोजन अधिकारी डॉ. राम ठाकर, डॉ. कविता साळुंके, धावपटू कविता राऊत, अभय कुलकर्णी, डॉ. नितीन ठोके आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button