इतर

संगमनेर ला भगवा महामोर्चा; शहरासह ग्रामीण भागांत कडकडीत बंद


संजय साबळे

संगमनेर प्रतिनिधी

सकल हिंदू समाज आणि विविध संघटनेच्या वतीने संगमनेर शहरांमध्ये मंगळवारी 6 जूनला भगवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला संगमनेर शहरासह 190 खेड्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने तरुण, नागरिक, महिला आणि युवती या मोर्चात सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून मोर्चात सहभाग दाखवला. संगमनेरच्या मोर्चामध्ये प्रत्येक ठिकाणी माणूसच माणूस शिवाजी महाराजांचा झेंडा हातात घेत संगमनेरचे वातावरण हे भगवेमय केले होते. जय भवानी जय शिवराय जय श्रीराम रामकृष्ण हृदयात ठेवा बजरंग बली की जय अशा हजारोच्या संख्येने घोषणा देत सकाळी लालबहादूर चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारती समोरील सभेतून झाली. तत्पूर्वी संगमनेर नगरपालिका, लालबहादूर शास्त्री, बाजार पेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, नवीन नगर रोड येथे जवळपास 30 ते 35 हजारच्या जनसैलाबचा मोर्चा येऊन धडकला.

पोलीस प्रशासनाने या मोर्चा बाबत आपली भूमिका चोख निभावल्याचे दिसून येते शहरात कर्फ्यू लागल्यासारखे वातावरण जाणवत होते. जागोजाग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

मोर्चानंतर समनापूर मध्ये वाहनावर दगडफेक

सकल हिंदू संघटनेने अन्याय अत्याचार विरोधात संगमनेर मध्ये अद्वितीय भव्य असा मोर्चा काढला. हा मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर मोर्चेकरी आपापल्या घरी परत जात असताना समनापुर येथे काही दुकाने चालू असताना काही समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे गाड्याची तोडफोड झाली, काही तरुणांना मारहाण देखील करण्यात आली यात दोघे ते तिघेजण जखमी झाले असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती समजतात पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्वाती भोर, सोमनाथ वाघचौरे, भगवान मथुरे, देविदास ढुमणे हे पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सामनापूर येथील तणाव काही प्रमाणात निवळ्याचे समजते. पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की हल्लेखोरांची ओळख पटवून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अद्याप पोलीस प्रशासनाला हल्लेखोर सापडले नसल्याचे निष्पन्न होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button