नरेंद्र घुले यांच्याकडुन जाधव कुटुंबांचे सांत्वन

.
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या बरोबर राजकारण व समाजकारणात काम करण्याची संधी मिळाल्याने, स्व जाधव ( आण्णा ) यांच्याकडे धर्मिक, समाजसेवेचा फार मोठा वसा होता.भातकुडगाव फाटा परिसरात लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्याबरोबर विविध क्षेत्रात काम करतांनी स्व.मारुतराव जाधव यांनी कधीही पदाची आपेक्षा केली नाही. धार्मिक व आध्यमिक क्षेत्रात त्यांचा नेहमी ओढ असल्यामूळे देवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातील ते एक सदस्य होते.शेती क्षेत्रातही त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेती समृध्द केली. त्यांच्या जाण्याने फार दुःख झाले. अशा शब्दांत लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी जाधव कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, शंकरराव बेडके, राष्टवादीचे युवा नेते राहुल बेडके, विठ्ठलराव आढाव, हरिचंद्र जाधव, माजी सरपंच बाळासाहेब मारूतराव जाधव, विकास संस्थेचे चेअरमन बबनराव जाधव व जाधव कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.