समाजाला पुढे घेऊन जातात ते पुरोगामी… डॉ तांबे
संगमनेर प्रतिनिधी
समाजाला जे विचार पुढे घेऊन जातात व ज्यात समाजाचे हित आहे असा प्रत्येक विचार पुरोगामी आहे.हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजातील सर्वांसोबतच कलाकारांनी देखील पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ .सुधीर तांबे यांनी केले.
ते स्वर्गीय चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या सेवा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दुर्गाताई तांबे, प्राचार्य सुभाष माळवदकर, प्राचार्य एन .टी. कानवडे, मदन महाराज वर्पे, विलास वर्पे आदी उपस्थित.
डॉ तांबे आपल्या भाषेत म्हणाले की वर्तमानामध्ये समाजात अनेक समस्या आहेत .अशा परिस्थितीमध्ये विवेकाने पुढे जाण्याची गरज आहे. यासाठी पुरोगामी विचाराची कास धरून चालण्याचा प्रयत्न व्हायला हवा .समाजाला पुढे घेऊन जाणारा प्रत्येक विचार हा पुरोगामीच असतो.भोवताल मधील अंधार नष्ट करण्यासाठी विवेकी विचाराचा प्रकाश प्रज्वलित करण्याची गरज निर्माण झाली आहे .उत्क्रांती होते आहेत. बुद्धीचा प्रवास करतो आहोत त्या गतीने मानसिक उत्क्रांतीची गरज निर्माण झाली आहे. समाज गतिशील झाला तर विकासाचा लाभ सर्वांना घेता येईल त्यामुळे समाजात उत्तम काम करणाऱ्या लोकांना अशा स्वरूपाचे पुरस्कार देऊन डॉ. मुटकुळे यांनी पुरोगामी विचाराची कास हाती घेऊन समाजात प्रेरणा देण्याचे काम केले आहे असे गौरव उद्गारांनी तांबे यांनी काढले.
दुर्गाताई तांबे आपल्या भाषण म्हणाल्या की, समाजात शहाणपण पेरण्याचे काम आपल्या लेखणी द्वारे सातत्याने मुटकुळे यांनी केले आहे. त्यांच्या परिवाराने एकत्रित येऊन आई-वडिलांचे स्मरण म्हणून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुरस्कार देऊन गौरव करण्याचा प्रयत्न म्हणजे उत्तम विचार जिवंत ठेवण्याचा व प्रेरणा देण्याचा भाग आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुरस्कार निवडी मागील भूमिका डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी मांडली.
अहमदनगर येथील कलाकार आयुब खान, डॉ.उल्हास कुलकर्णी यांना नाट्य सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.अरविंद रसाळ, डॉ .सुधाकर पेटकर , डॉ जी.पी. शेख यांना आरोग्य सेवेबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. भारतीय बाबा विद्यालयाच्या दहावीत यश प्राप्त करणारे विद्यार्थी वर्पे या दोघांना सम्मानित करण्यात आले.
सूर्यकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले.विलास वर्पे यांचे भाषणे झाले.अयुब खान व डॉ. उल्हास कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. प्रवीण घुले यांनी गीत गायनाने आरंभ केला .आभार रमेश पावसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुरेश परदेशी, रवींद्र पगार ,दत्ता बटवाल ,राजभाऊ भडंगे ,दीपक टाक ,प्रफुल्ल भाडंगे ,विजय टिळे ,प्रदीप घुले ,डॉ. किशोर पोखरकर , राजेंद्र नवले ,विजय मुटकुळे ,ज्योती कुलथे ,ज्ञानेश्वर वर्पे, सुनील मंडलिक, बाळासाहेब घुले विशेष प्रयत्न केले. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.