इतर
पळवे खुर्द येथील जगताप कुटुंबाची भाची कु. प्रियंका दिनेश लोखंडे हिची मुंबई पोलिस पदी निवड

दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी :
प्रियंका लोखंडे हिची पोलीस पदी निवड झाल्याने तिचा सत्कार सुपा पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांच्या हस्ते पळवे खुर्द ता. पारनेर जि. अ. नगर या ठिकाणी करण्यात आला व तिला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी सुपा पोलिस स्टेशनचे काॅन्स्टेबल ठोंबरे , तांबोळी मॅडम तसेच संजय तरटे( चेअरमन), रामदास आबा तरटे, संजय नवले ( सर), पोपटराव तरटे , हरिभाऊ भंडलकर , दत्तात्रय जगताप , बाळासाहेब जाधव ,झुंगदेव जगताप , शिवाजी जगताप, पोपटराव जगताप, सुदाम जगताप, संतोष जगताप , युवराज जगताप, वैभव जगताप, चंद्रकात जगताप, गणेश जगताप व जगताप परिवार उपस्थित होता. तसेच जगताप मामांच्या वतीने लाडक्या भाचीचा सन्मान करण्यात आला.