शासनाने स्वस्त धान्य दुकानातून कांदा मोफत द्यावा- तिकांडे

अकोले प्रतिनिधी
खुल्या बाजारातून कांदा खरेदी करून स्वस्त धान्य दुकानात शासनाने कांदा मोफत वाटप करावा अशी मागणी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली आहे
याबाबत त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की सध्या व्यापारी कांदा खरेदी अतिशय मर्यादित करत आहेत कांद्याचे उत्पादन वाढले आहे परंतु अवकाळी पावसाने कांदा साठवणी योग्य राहिला नसल्याने कांद्याची आवक बाजारपेठेत वाढली आहे यामुळे शासनाने हा कांदा खरेदी करून रास्त भाव स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना मोफत वाटावा असे म्हटले आहे
अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कांदा प्रत खालावली असल्याने शेतकर्यांना कांदा विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे आवक वाढली आहे.
एक तर शासनाने सदरचा कांदा खरेदी करून स्वस्त धान्य दुकानातून मोफत वाटप करावा अथवा जुन महिन्यापर्यंत बाजारात येणाऱ्या कांद्यास 500 रुपये प्रमाणे अनुदान शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करावे. असे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास पाटील तिकांडे यांनी म्हटले आहे