इतरकृषी

सातेवाडी परिसरातील खर चोंड बंधाऱ्याचे कामासाठी नदीपात्रात उपोषणाचा इशारा!

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील सातेवाडी परिसरात कृष्णावंती नदीवर खरचोंड येथे को.प बंधाऱ्याच्या कामासाठी परिसरातील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे

खरचोंड को. प. बंधाऱ्याचे काम मंजूर असतानाही कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून हे काम धुळखात पडून आहे
सुमारे 80 लाखापेक्षा अधिक रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचे काम मंजूर आहे दोन वर्षापासून या कामाची वर्कऑर्डर झालेली असतानाही काम सुरू करण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे
पाटबंधारे विभागाच्या जल व मृदसंधारण उपविभाग संगमनेर या विभागामार्फत येथे को प बंधारा 2019 मध्ये मंजूर झाला या कामाची वर्कऑर्डर मांडे नावाच्या ठेकेदाराला देण्यात आली . स्थानिक शेतकऱ्यांची कुठलीही हरकत नसताना देखील शेतकऱ्यांवर खापर फोडत ठेकेदाराकडून कामाला विलंब होत आहे असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हे काम सुरू करण्यासाठी नदीपात्रातच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे
काम सुरू न झाल्यास दिनांक 26/ 5 /2023 पासून बंधारा स्थळी नदीपात्रात उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कृष्णां दिघे यांनी दिला आहे अनेक वर्षांपासून आम्ही या बंधाऱ्यांची मागणी करत आहोत पण या कामाला मुहुत मिळत नसल्याचे सातेवाडी ग्रामपंचायत चे माजी सदस्य बाळू मुठे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गंगाराम दिघे, लहू आबा मुठे यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button