इतर
वाळुंज कुटूंबाने सामाजिक बांधिलकी जपत ठेवला आदर्श -गुरुवर्य ह.भ.प.डॉ.विकासानंद महाराज मिसाळ –
- दत्ता ठुबे /पारनेर:-
काकणेवाडी येथील दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक श्री.गवरामशेठ वाळुंज यांचे चि.युवराज तसेच आई वडील,चुलता चुलती यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सर्व वाळुंज परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुरुवर्य ह.भ.प.डॉ. विकासानंद महाराज मिसाळ होते. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मुलगा युवराज व आपले आई वडील सौ.सिंधुताई व श्री.चिमाजी वाळुंज आणि चुलता चुलती सौ.कमल व श्री.मारुती वाळुंज गुरूजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करताना एक समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ह्या कुटुंबाचा गावात धार्मिक,शैक्षणिक व सामाजिक कार्यात सतत अग्रस्थानी असत. यावेळी संत पंढरी ,आद्य जगतगुरू शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था पिंपळगाव वाघा या संस्थेसाठी 51,000 रु.देणगी दान देण्यात आली व काकणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कुल बॅगचे वाटप महाराजांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराजांनी वाळुंज कुटुंबांचा सन्मान करून दातृत्वा बद्दल आभार मानून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच गिताराम वाळुंज, माजी उपसरपंच निवृत्ती वाळुंज, श्रीराम सोसायटीचे चेअरमन प्रदीप वाळुंज, मधुकर बर्वे सर, जानकु इघे सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी बाहेरून आलेली पाहुणे मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाळुंज कुटुंबाच्या वतीने गुरुवर्य डॉ.ह.भ.प.मिसाळ महाराजांना सन्मानित करण्यात आले. वाळुंज परिवाराच्या वतीने सुरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळुंज परिवारातील संदीप वाळुंज,गवराम वाळुंज, रविंद्र वाळुंज,अविनाश वाळुंज,ऋषिकेश वाळुंज यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन आप्पासाहेब वाळुंज यांनी केले तर आभार श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष जयवंतशेठ वाळुंज यांनी मानले.