उपअभियंता डी. एस. बंड यांचा गुरुवारी अकोल्यात सेवापूर्ती समारंभ !

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, अकोले उपविभागाचे उपभियंता इंजि.दिनकर शंकरराव बंड हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे या निमित्ताने त्यांचा सेवापूर्ती समारंभ गुरुवार दि.१/६/२०२३ रोजी सायं. ०५.०० वाजता.आयोजित करण्यात आला आहे
इंजि डी एस बंड यांची संगमनेर अकोले तालुक्यात सेवा झाली एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी आदिवासी भागात अनेक रस्ते, शाळा ,अंगणवाड्या ,शासकीय इमारतींचे कामे झाले आदिवासी भागातील अनेक खेडे पाड्या पर्यंतच्या रस्त्यांची कामे त्यांनी मार्गी लावली
त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने साई लॉन्स इंदोरी फाटा, इंदोरी ता. अकोले, जि.अ.नगर येथे सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सत्कार सोहळा समिति चे वतीने करण्यात आले आहे