पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा नऊ वर्ष चा यशस्वी कार्यकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असताना सत्तर वर्षात काँग्रेस ज्या गोष्टी करू शकले नाही या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे, दहशतवाद, बॉम्स्फोट च्या बातम्या ऐवजी भ्रष्टाचारी अटक अन शांतता च्या बातम्या येत असून देश बदलला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी म्हणजे 2014 पूर्वी या क्षेत्रात लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या येत होत्या. भ्रष्टाचाराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. आज भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई झाल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांची जमवाजमव होऊन ते रस्त्यावर आले.
पूर्वी शहरांमध्ये बॉम्बस्फोटांच्या बातम्या असायच्या, नक्षलवादी घटनांच्या हेडलाइन असायच्या. आज शांतता आणि समृद्धीच्या अधिक बातम्या आहेत. पूर्वी पर्यावरणाच्या नावाखाली मोठमोठे पायाभूत प्रकल्प बंद पडल्याच्या बातम्या येत होत्या. आज पर्यावरणाशी संबंधित सकारात्मक बातम्यांसोबतच नवीन महामार्ग-एक्स्प्रेस वे बांधण्याच्या बातम्या येत आहेत. पूर्वी रेल्वे अपघाताच्या बातम्या नेहमीच येत होत्या. आज आधुनिक गाड्यांची ओळख ठळक आहे. पूर्वी एअर इंडियाच्या घोटाळ्यांची चर्चा व्हायची, आज जगातील सर्वात मोठ्या विमान सौद्याची बातमी जगभर चर्चेत आहे.
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डेटा ग्राहकांच्या बाबतीत हा स्मार्टफोन नंबर वन आहे. ही दुसरी सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी आहे आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. जगातील आघाडीचे अर्थतज्ञ, विश्लेषक आणि विचारवंत एकाच आवाजात सांगत आहेत की भारतासाठी ही वेळ आली आहे.
२०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले अन देशात अनेक कामे सुरु झाली, जी काँग्रेस च्या काळात कधीच झाले नसते. राममंदिराचे काम चालू झाले. जम्मू काश्मीर चे कलम ३७० हटले. भारतीय सेनेचं आधुनिकीकरण झाले.३६ राफेल खरेदी केले.विक्रांत चे जलावतरण झाले. भव्यदिव्य काशिविश्वनाथ काॅरीडाॅर, उज्जेन काॅरीडाॅर झाला. नमामी गंगे मुळे झालेली गंगा सफाई झाली. चंद्रयान मंगळयान योजना सफल झाल्या. किसान सम्मान योजना आली. नवीन संसदभवन झाले. तीन तलाक कायदा झाला.
चिनाब ब्रिज झाला. बोगीबिल ब्रिज झाला.लडाख अरुणाचल सिमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे झाले.अटल टनल पुर्ण झाला. पुर्वांचल मधील राज्यांना रेल्वे, हायवे, विमानतळा सारख्या पायाभूत सुविधा मिळाल्या.लडाख, अरुणाचल सिमाविभागात कार्यक्षम दुरसंचार यंत्रणा उभी राहीली. १८ हजार पेक्षा जास्त दुर्गम ठिकाणी असलेल्या खेडी, वाड्या, वस्त्यांना विज पोहचली. सोलर ऊर्जेत भारत जगात तीन नंबर वर झाला.
परदेशी निधीवर धर्मांतर करणारे व गुप्तपणे देशविरोधी कारवाया करणारे इन जी ओ बंद केल्या. सर्जिकल स्ट्राईक झाला. ई डी आणी सी बी आय चा कार्यक्षम वापर करुन भ्रष्टाचारावर आळा आला व भ्रष्टाचाऱ्यांना धाक बसला.
दुरदर्शनला “सत्यं शिवम सुंदरम्” तर नवोदय विद्यालयाला “तमसो मां ज्योतिर्गमय” टॅग लाईन परत मिळाली. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होऊ लागला.
नॅशनल पोलिस मेमोरियल झाले .
रेल्वेचं आधुनिकीकरण व विद्युतीकरण एवढ्या वेगाने झाले. एअरपोर्ट सारखी रेल्वे स्टेशन झाली, वंदेभारत ट्रेन देशाला मिळाली.
जम्मु, काश्मीर व लडा़ख तीन वेगळी राज्ये झाली. जम्मु काश्मीर मध्ये “एक निशान, एक प्रधान, एक संविधान” झाले.
“मेक इन इंडिया” कार्यक्रम सुरु झाला. “आत्मनिर्भर भारत” हि संकल्पनाच अस्तित्वात आली. “स्टार्ट अप भारत” हि संकल्पना आली अन आज १०० च्यावर स्टार्टअप चे युनिकाॅर्न मध्ये रुपांतर झाले. चीनी मालाचे डंपिंग थांबले.
मास्कचा, पी.इ.पी. किटचा भारत निर्यातदार बनला. कोरोनात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्पेशल “ऑक्सिजन एक्सप्रेस” धावली व विमान उड्डाणे झाली. युक्रेन मधुन २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व नागरिक तत्परतेने सुखरुप परत आले.
अर्थव्यवस्था डामडौल असल्याने फ्रि कोरोना लस व करोना काळात फ्रि रेशन मिळाले. देशातील १२ कोटी खेड्यापाड्यातील लोकांना मोफत शौचालये मिळाली. उज्वला योजनेअंतर्गत गरीब ७ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले. काँगेस सरकार असत तर कोरोनात देशाची पुरती वाट लागली असती. लसीसाठी परदेशांवर अवलंबून रहावे लागले असते. एवढ्या कमी कालावधीत २०० कोटींपेक्षा जास्त मोफत लसीचे डोस लोकांना मिळाले. जनतेचा रोष ओढवू नये म्हणुन पेट्रोल, डिझेल, गॅसवर सबसिडी देऊन भारताची अवस्था श्रीलंकेसारखी झाली असती.
जपान कडुन फक्त .५% दराने ५० हजार कोटी कर्ज घेऊन बुलेट ट्रेन योजना कार्यान्वित झाली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतातुन रस्ता तयार झाला केला. लडाख विमानतळ नुतनीकरण केले. संसद भवनात मिळणारे ५ रुपयांत जेवण बंद झाले. मंत्र्याच्या गाडीवरील लाल दिवे गायब झाले.
रेल्वे मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डेडिकेटेड फ्रेट काॅरिडाॅर मिळाला. खादीचा आग्रह न धरल्यामुळे खादी ग्रामोद्योगाला नवसंजीवनी मिळाली.
मरगळलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स ला नवसंजीवनी मिळाली तेजस, लढाऊ, सारस प्रवासी विमाने व हॅलिकाॅप्टरच्या स्वदेशी निर्मिती झाली. स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन झाले. भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण देशात रस्ते विकास चालू आहे. सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाले. सागरमाला प्रोजेक्ट मुळे सुरु झालेली नद्यांमधुन दळणवळण व्यवस्था सुरु झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दिवाळीला सेनेच्या वेगवेगळ्या बटालियन मध्ये जाऊन त्यांच्याबरोबर राहुन सैनिकांना जिव्हाळा व भावनिक ऊब देण्याचे काम केले. भारतीय सेनेला सी डी एस कार्यप्रणाली मिळाली. सेनेला “वन रॅंक वन पेंशन” मिळाली. सेनेला “नॅशनल वाॅर मेमोरियल” मिळाले. “तारागिरी” मध्यम डिस्ट्राॅयर स्वदेशी युद्धपोत मिळाला. भारतीय नौसेनेचा गुलामीचे प्रतिक असलेला ध्वज बदलुन शिवमुद्रा रुपात झाला.
चीनला एवढा प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला नसता. शेकडो किमी जमीन हडपुनच तो शांत झाला असता. वारंवार पाकला आतंकवादा वर घेरुन व आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडा पाडुन पाक ग्रे लिस्टमध्ये गेला. भारत पाक सीमा इस्रायली तंत्रज्ञानाने सिलबंद झाली नसती. आतंकवादी आणी पाकच्या कुरापतींना ठोकण्यासाठी पुर्णपणे मोकळीक सेनेला दिली. पोक आणी अक्साई चीन घेणे भाजपाच्या विचाराधीन आहे. त्यांवर नियोजन चालू आहे. हे काॅंग्रेसने ७० वर्षात कधी केले नाही व कधीच केले नाही. काॅंग्रेसने कधीही ५० हजारांहून जास्त सेना बर्फात उंच पर्वतावर ठेवलीच नसती कारण तेथे एवढ्या मोठ्या संख्येने निर्वाह करण्यासाठी साधन सामुग्रीच सेनेकडे नव्हती. ब्रम्हदेशाच्या निबिड जंगलातुन नक्षलवादी गट भारतात घुसणार आहे कळल्यावर भारतीय सेनेने हॅलिकाॅप्टर मधुन कारवाई करून सगळे ठार मारले होते.जम्मु काश्मीर मधील फुटीर पाकधार्जिन्या हुर्रियत काॅन्फ्रंसच्या लांडग्यांची ५ स्टार ऐश सरकारी खर्चावर बंद केली. रोहिंग्या आणी बांगलादेशी कोट्यवधी संख्येने भारतात घुसवले असते.नक्षलींना लगाम लागला.
पी. चिदंबरम, लालू, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत सारखे भ्रष्टाचारी जेलमध्ये गेले. देशातील अनेक बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले.
जम्मु काश्मीर मध्ये मंदिरांचे पुनर्निर्माण सुरु झाले.काश्मीर मधील लाल चौकात तिरंगा फडकला नसता. हजारो, लाखो बोगस मदरसे, बोगस मुले, बोगस शिक्षक सापडले. सरकारी अनुदान वाटत राहिले असते. लाखो बोगस रेशनकार्ड, पॅन कार्डधारक, बोगस वृद्धावस्था पेन्शन घेणारे सापडलेत नसते. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ५ कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडली ती सोडलीच नसती. कोट्यवधी लोकांना घरासाठी सबसिडी मिळाली, संडास सह घरे बांधुन मिळाली.
आता पर्यंत अनेक चमच्यांना, जोडेचाटू लोकांना पद्म पुरस्कार दिले गेले. परंतु आता तळागाळातील निस्वार्थपणे समाज सेवा करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातात.
काश्मीर मध्ये चिनाब आणी झेलम नदीवर धरण बांधुन विज निर्मिती केली आहे. ते पाणी पाकला न देता भारतात वळवण्यात येत आहे. हे काम ७० वर्षांपासून झाले नाही व अजुन झाले नसते. ज्ञानवापी व मथुरा प्रकरणे कोर्टात गेली.
मलेशियाने ३७० हटवल्यावर बडबड केली होती. तेव्हा तेथून आयात होणाऱ्या पामतेलावर बंदी घालुन मलेशियाची आर्थिक दृष्ट्या कंबर मोडुन मस्ती उतरवली होती. युक्रेन युद्धावेळी अमेरिका व रशिया बरोबर भारताने उच्च कुटनीतीने आपला फायदा करुन घेतला.
खेळ मंत्रालयाने खेळाडुंना जास्तीत जास्त सहकार्य करुन, आर्थिक मदत करुन जास्तीत जास्त पदके कशी मिळतील असा प्रयत्न केला, अंतराराष्ट्रीय विजेत्या खेळाडूंना वैयक्तिक फोन करुन बोलणे, टिम देशात परत आल्यावर भेटणे, सेल्फी काढणे त्यांच्याशी चर्चा करणे व त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले.
समान नागरी कायदा व जनसंख्या नियंत्रण कायद्यावर विचार सुरु केला आहे. समान नागरी कायदा व जनसंख्या नियंत्रण कायद्या साठी मोदीजी यांना २०२४ साठी पुन्हा संधी मिळाली पाहिजे असे मत जनसामान्य नागरिक व्यक्त करित आहे.
शब्दांकन:-

श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर जिल्हा