लासलगांव रेल्वे स्टेशन संधाननगर सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षपदी एकमताने निवड

नाशिक प्रतिनिधी/ डॉ शाम जाधव
लासलगांव रेल्वे स्टेशन टाकळी विंचुर संधाननगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरी यांच्या १३४ व्या जयंती निम्मीत जाहिर बैठक संपन्न झाली
सदर प्रसंगी प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मागील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती ऊस्तव समीतीचे अध्यक्ष तेजस निरभवने, खजीनदार आदित्य एळींजे व मागील सर्व कार्यकारणीचे सदस्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुहिक वंदना घेऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकी प्रसंगी मागील जयंती ऊस्तव समीतीने अतीशय शांततेत व विवीध कार्यक्रमाचे आयोजन करत भिमजयंती महोस्तव पार पाडला त्यांचे अभिनंदन करूण खजीनदार आदित्य एळींजे यांनी मागील जयंतीचा जमा खर्चाचा आर्थीक अहवाल सादर केला सालाबादप्रमाणे याहि वर्षी भिम जयंती महोत्सवा मध्ये समाज ऊपोगी ,प्रबोधनाचे व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले त्यामधे जाहिर व्याख्यान,आरोग्य विषयक शिबिर,लहान मुल,मुली व विध्यार्थ्यांन साठी महापुरूषाच्या जिवन चरित्रावर आधारीत ,प्रश्नावती स्पर्धां, वकृत्व स्पर्धां,निबंध स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती ऊस्तव समीती कार्यकारणीची निवड करुन पुढील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली सन २० २५ भिम जयंती ऊस्तव समीती अध्यक्ष पदि सनी पाठक ऊपाध्यक्ष आर्दश निकम कार्यध्यक्ष सचीन पगारे,सचीव किरण संसारे खजीनदार सतीष संसारे, सह खजीनदार मनोज केदारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली सदर प्रसंगी अड रविंद्र भालेराव, दिपक संसारे, शाम साळवे गणेश शिरसाठ , विशाल एळींजे,तेजस संसारे संपत
शिरसाठ, राहुल एळींजे राम साळवे, रोहित निकम, संत्यजीत दाभाडे,राम साळवे संकेत गरुड,भिमा लोंखंडे, किरण मोरे तेजस निरभवने, आदित्य एळींजे आदी उपस्थित होते भिमजयंती महोस्तव शांततेत, प्रबोधनात्मक,विधायक कार्य करत मोठ्या ऊस्ताहात साजरा करण्याचे सर्वांनुमते ठरवण्यात आले