चास येथीलभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या चौकशीची टाळाटाळ ?

अकोले प्रतिनिधी
भैरवनाथ सार्वजनिक देवालय ट्रस्ट चास या संस्थेची चौकशी करून तातडीने कार्य वाहीचा अहवाल आपल्या कार्यालयामार्फत शासनास पाठवावा असे धर्मादाय उप आयुक्त भा. स.गायकवाड यांनी धर्मादाय उप आयुक्त अहमदनगर यांना चार महिन्यापूर्वी २१ जून २०२२ रोजी पत्र पाठवूनही अद्याप कारवाई न झाल्याने, तक्रारदार गोरक्ष सावळेराम कहाने यांनी तहसीलदार अकोले यांचेकडे संबधित ट्रस्टवर कारवाई न झाल्यास आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे लेखी निवेदन दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांनाही असे निवेदन दिले आहे. पाठविलेल्या निवेदनात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे
श्री. भैरवनाथ सार्वजनिक देवालय, ट्रस्ट, चास, ता.अकोले, जि. अहमदनगर नोंदणी क्रमांक- ए- ११५२. ( अहमदनगर ) रजि. दिनांक ३१/०७/२००१.या देवस्थानच्या बेकायदेशीर सावकारकी व इतर कारभारा बाबत मी मा.उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांना अनेक वेळेस तक्रार अर्ज दिलेले आहेत. मी मा.उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांना दिनांक ०५/०४/२०२२ रोजी तक्रार अर्ज दिला आहे. त्या पत्राच्या आधारे विधी व न्याय विभाग मुंबई यांनी दिनांक ०६/०५/२०२२ रोजी मा. धर्मादाय आयुक्त यांना १९/०५/२०१२ रोजी पत्र पाहून सदर तक्रार अर्जावर तत्काळ चौकशी करुन शासनास व अर्जदारास अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आज पर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही. सदर पत्राला मा. उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर कार्यालय यांनी केराची टोपली दाखवली आहे.तसेच विधी व न्याय विभाग यांनी दिनांक १०/०६/२०२२ रोजी सदर तकार अर्जा बाबत मा.उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर. यांना स्मरण पत्र पाठून अहवाल सदर करण्यास सांगितले तरीही त्या पत्राचीही मा.उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर. यांनी दखल घेतलेली नाही.

त्या नंतर कहाने यांनी मा. उप धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांना दिनांक १९/०८/२०२२ रोजी चौकशी करण्या बाबत विनंती अर्ज दिला असून त्या अर्जाने कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात पैशाची अफरातफार सुरू असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे .
सदर देवस्थानचे पदाधिकारी देवस्थानच्या पैशाचा सावकारीचा व्यवसाय करतात. व सर्व सामान्य लोकांना त्रास देतात.त्याचे पुरावेही आहेत. तसेच ट्रस्ट ने जे लेखा परीक्षण अहवाल: धर्मादाय कार्यालयात दाखल केलेले आहेत. ते सर्व बनावट व खोटे दाखल केलेले आहेत. सदर देवस्थान मधील नोंदणी करते वेळेस हयात असणारे अनेक ट्रस्टी मयत आहेत, त्यांचा आज पर्यंत कोणताही बदल अर्ज मे. कोर्टात दाखल नाही. काही ठरविक विश्वस्त मनमानी पद्धतीने कामकाज करतात. लोकांना व्याजाने पैसे वाटतात. त्यांच्या कडून आवाचे सव्वा व्याज वसूल करतात. लोकांना त्रास देतात. देवस्थानच्या पैशाचा दुरुपयोग करतात. याची चौकशी करण्या बाबत अनेक वेळेस तक्रार अर्ज दिलेले आहे.सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कहाने यांनी दिला तसे निवेदन अकोले तहसीलदार सतिश थिटे यांना दिले आहे———
