संस्कृती सातपुते ही इ.१०वी च्या परीक्षेत ग्रामीण भागातून प्रथम.

.
संगमनेर/प्रतिनिधी-
येथील मानव विकास मंडळ संचलित, काशेश्वर विद्यालय कासारा दुमाला ता. संगमनेर येथील इ.१०वीचा शालांत परीक्षेचा निकाल ९८.१४% लागला असून विदयालयाने याही वर्षी निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.या विदयालयाची विदयार्थीनी कुमारी संस्कृती सकाहारी सातपुते हिने इ.१०वी च्या शालांत परीक्षेत ९६.४० % गुण मिळवून विदयालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्याचप्रमाणे आनखी एक मानाचा तुरा रोवून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहीती विदयालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
तसे पाहीले गेले तर संस्कृतीचे वडील सकाहारी तसेच आई रोहीणी शेती व दुग्ध व्यावसायावर आपल्या कुटूंबाची उपजिवीका करत असतात.संस्कृती दररोज आपल्या आईवडीलांना घरी कामाला मदत करून अभ्यास करत असे.शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन अन आईवडीलांचे संस्कार यापेक्षा वेगळे जिवन नाही.ध्येयाचा ध्यास घेतला की व्यक्ती इच्छित ध्येया पर्यंत पोहचू शकतो. याचे मृर्तिंमंत उदाहरण म्हणजे संस्कृतीचे ग्रामीण भागातील यश आहे.असेच म्हणावे लागेल. अभ्यास, ध्येय व चिकाटी या जोरावरच संस्कृतीने तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथम क्रमांक मिळविल्याचा संगमनेर तालुक्यासह पंचक्रोशीत सार्थ अभिमान आहे.
याचप्रमाणे या विदयालयातील कुमारी वैष्णवी संजय वर्पे या विदयार्थीनीने ९२.६० % गुण मिळवून दुसरा क्रमांक, कुमारी सृष्टी संजय सावंत हिने ८८.६०% गुण मिळवून तिसरा क्रमांक, कुमार मयुर अमोल सातपुते याने ८८.२०% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर कुमार पांगारकर समर्थ चंद्रकांत याने ८५.८०% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
या घवघवीत यशाबद्दल गुणवंत विदयार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे मानव विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुभाष गुंजाळ,उपाध्यक्ष रामनाथ वर्पे,सचिव संजय सातपुते, सहसचिव संतोषराव शिंदे,खजिनदार अॅड.संजय दिक्षित,संचालक बाळासाहेब वाळके,अशोक सावंत,बी.के.गायकवाड,शांताराम घुले,शिवाजी पोखरकर,बाबूलाल बुळकुंडे,शांताराम आंबरे,कैलास फटांगरे,अनिता वाळके,अलका सावंत, ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र त्रिभुवन,उपसरपंच अमोल वाळके, भोलेनाथ पतसंस्था, दुध संस्था,वि.का.सेवा सोसायटी, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक आदींनी अभिनंदन केले