पुढा-यांच्या नावाच्या पाट्या लावायच्या का नाही हे पारनेरच्या जनतेला ठरवू दया,-अविनाश पवार

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात राजकीय पक्षांचे पाटीवर नाव येण्यासाठी चाललेली चढाओढ हास्यास्पद आहे. जनतेला विकास हवा आहे तो पारनेर तालुक्यात कुठे ही दिसायला तयार नाही.
पारनेरच्या पुढा-याने पाट्यांवरच्या नावासाठी चढाओढ करण्यापेक्षा लोकांच्या मनात आपल नावं रुजवावे पाट्यांवरच नावं ज्या प्रकारे दर्जेदार रंगविले जाते,फोटो लावले जातात याची जशी दक्षता घेतली जाते त्याचप्रमाणे तालुक्यात कामं दर्जेदार करा.पारनेर तालुक्यात स्वयंघोषीत पुढा-याने टक्केवारी घेऊन झालेली कामं निकृष्ठ दर्जाचीच असल्याचा गंभीर आरोप मनसेचे माथाडी कामगार सेना अध्यक्ष अविनाश पवार यांनी केला आहे त्यामुळे वर्षानुवर्षं पारनेरची दुष्काळी तालुका ओळख पडलेलीच आहे,हा दुष्काळी तालुका ओळख मिटविण्यासाठी झालेली कामं दर्जेदार असायला हवीत यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे एवढा पाऊस पडला तरी ठिकठिकानी फेब्रुवारी,मार्च मध्येच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नावासाठी हपापलेल्या प्रतिनिधींकडुन भले मोठे बोर्ड लाऊन विकास कामांची उदघाटने झाली पण काही महिन्यातच बंधारे,रस्ते अक्षरशः वाहुन गेले आहेत ही तर सर्व सामान्य जनतेसह शासनाची ही मोठी फसवणूक केली गेली आहे लोकांना फक्त गृहीत धरले जाते आहे.पुढारी विरहित पारनेर तालुक्यात सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेली राळेगणसिद्धी भागातील कामं दर्जेदार आहेत.त्यामुळे जनतेच्या पैशातून होणारी कामं लोकांना ठरवू द्या पाटीवर नावं कोणाचं द्यायचं? श्रेय लाटण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करणा-यांना येणा-या काळात जनता यांची जागा दाखवणार हे मात्र नक्की असे पवार यांनी बोलताना सांगितले.