खिरविरे येथील सर्वोदय विदयालयाच्या प्राचार्यपदी मधुकर मोखरे.

अकोले/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे प्राचार्य पदी मधुकर मोखरे यांची नियुक्ती करण्यात आली. येथील विदयालयाचे माजी प्राचार्य लहानु पर्बत हे नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागी राजूर येथे पर्यवेक्षकपदी काम करणारे मधुकर मोखरे हे सेवाजेष्ठतेनुसार १ जुन २०२३पासून खिरविरे येथील विदयालयाच्या प्राचार्य पदी नियुक्त झाले आहे.
मधुकर मोखरे यांचे मुळ गाव समशेरपुर हे आहे. सुरूवातील १३ जुन १९९६ साली खिरविरे येथील सर्वोदय विदयालयात हिंदी विषयासाठी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सन २००२ पासुन सहा वर्षानंतर त्यांनी कातळापुर विदयालयात ज्ञानदानाचे कार्य केले. त्यानंतर दहा वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सन २०१२ रोजी त्यांची गुरूवर्य रा.वी. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर राजूर येथे त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली. पुन्हा सन २०१७ पासून कातळापुर विदयालयात पाच वर्षे सेवा केली. त्यानंतर सन २०२२पासुन पाच वर्षे त्यांनी राजूर विदयालयात पर्यवेक्षकपदाचा कार्यभार स्विकारला. त्याचप्रमाणे आता १ जुन २०२३पासुन त्यांची सेवाजेष्ठतेनुसार खिरविरे येथील प्राचार्य पदी नियुक्ती झाली आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेवून त्यांनी शिक्षक पदवी संपादन केली आहे. त्यांची अकोले तालुक्यातुन हिंदी संशोधन केंद्रात राष्ट्रीय स्तरावर देखील निवड झाली आहे. त्यामुळे शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास हा वाखान्याजोगा आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे खिरविरे विदयालयात शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य लहानु पर्बत यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.