ग्रामपंचायत जायनावाडी,बिताका येथे कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान.

अकोले/प्रतिनिधी-
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बालकल्याण विभागामार्फत चालू वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार देण्यात आला. या दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराच्या पहिल्या वर्षीच्या मानकरी जायनावाडी येथील श्रीमती. काळाबाई श्रावना भांगरे व बिताका येथील सौ. मीना विठ्ठल पेढेकर या ठरल्या आहेत.
हा पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बाळू मारुती डगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप हे सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल , श्रीफळ व ५०० रुपये असे आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी सरपंच बाळू डगळे , उपसरपंच मनीषा भांगरे , ग्रामसेवक बापूसाहेब राजळे , ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे , पंढरी पेढेकर , सामाजिक कार्यकर्ते योगेश भांगरे, माजी सरपंच भोराबाई पेढेकर , अंगणवाडी सेविका अलका भांगरे , आशा सेविका सोमाबाई सुकटे , हिरामण भांगरे यांसह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेवक बापूसाहेब राजळे यांनी केले . ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.