बदलापूर घटनेच्या निषेधार्थ निघोज येथे गुरुवारी रास्ता रोको आंदोलन.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी निघोज येथील एस टी बस स्थानक परिसरात गुरुवार दि.२२ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार येणार असल्याची माहिती आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण यांनी दिली आहे.
या निवेदनाच्या प्रती खासदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. ढवण याबाबत सांगितले की बदलापूर शाळेतील लहान विद्यार्थींनीवर अत्याचार करुण मोठा गुन्हा केला असून या दुर्दैवी घटनेची पाठराखण राज्य सरकारने आरोपीवर कारवाई करण्यासाठी उशीर करुन एक प्रकारे आरोपी व ज्या शिक्षण संस्थेतील शाळेत हा घृणास्पद प्रकार झाला त्या शिक्षण संस्था चालकाला व आरोपीला पाठीशी घालण्याचा जो निंदणीय प्रकार झाला तो निषेधार्थ आहे. याविरोधात मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आहेत. याबाबत ग्रामीण भागात आंदोलन करीत राज्य सरकार संबंधित पोलिस अधिकारी व संस्था चालक यांचा निषेध होण्याची गरज आहे. यासाठी निघोज येथे गुरुवार दि.२२ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निघोज ग्रामस्थांनी केले आहे
. बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी निघोज येथे गुरुवार दि.२२ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे निवेदन पारनेरचे पोलिस उपनिरीक्षक खंडागळे यांना दिले देण्यात आले. यावेळी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, बाबा महाराज खामकर, शिवसेनेचे युवा नेते महेंद्र पांढरकर सुरेश रासकर, अक्षय भाकरे , राजाराम पांढरकर आदी उपस्थित होते.
आदी.