शिवशंभु स्मारकसाठी रायगडावरील माती आणि गंगाजल आणण्यासाठी काकणेवाडीचे युवक रवाना

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
शंभूराजे मित्र मंडळ शिवशंभु स्मारक समिती आणी काकणेवाडी ग्रामस्थ यांच्या सहयोगाने श्री क्षेत्र काकणेवाडी येथे साकारत असलेल्या शिवशंभु स्मारकसाठी लाखो तरुणांचे प्रेरणास्थान, मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील पवित्र माती आणि गडावरील पवित्र गंगाजल आणण्यासाठी गावातील तरुण गेले आहेत.यामध्ये शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राहुल वाळुंज,तसेच शंभूराजे मित्र मंडळाचे सदस्य शुभम वाळुंज, गणेश पवार,हर्षद वाळुंज ,अनिल वाळुंज,संचित वाळुंज हे आहेत.
तसेच हे सर्व तरुण किल्ले रायगडावर संपन्न होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
किल्ले रायगड वर गेलेल्या सर्व तरुणांचे लोकनेते आमदार निलेशजी लंके,मा. उपसभापती उमाजी वाळुंज, शंभूराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष गवरामशेठ वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाळुंज, (गव्ह.काॅन्ट्रॅक्टर)भगवानशेठ वाळुंज संभाजी वाळुंज (अध्यक्ष निलेशजी लंके प्रतिष्ठान )हभप दादाभाऊ महाराज वाळुंज, हभप रंगनाथ महाराज वाळुंज हभप प्रशांत महाराज वाळुंज यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.