महाराष्ट्र

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई-

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 11 वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 8 जूनपासून होणार सुरुवात तर 19 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे

: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा ( SSC Result) निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. याआधी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला होता. आता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे.

8 जून रोजी विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरता येणार आहेत. तर 19 जूनला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अकरावी प्रवेश मिळवण्यासाठी सहभागी होणे आवश्यक आहे. मुंबई विभागात आतापर्यंत अर्जाचा भाग एक भरून एक लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

8 ते 12 जून रात्री 10 वाजेपर्यंत -नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे
प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे.
विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येतील.
(विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल / अलॉटमेंट केले जाईल) विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी त्यांचा फॉर्म भाग-2 लॉक करावा
12 जून -प्रवेश अर्ज भाग एक भरणे,मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे
13 जून -तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे
13 ते 15 जून – विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे
15 जून अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे
19 जून सकाळी 10 वाजता- पहिला गुणवत्ता यादी जाहीर
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे.
विद्यार्थी लॉगीनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.
संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्याथ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे
फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)
19 ते 22जून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
23 जून दूसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे
पुढील फेर्‍यांसाठी संभाव्य तारखा
नियमित दुसरी प्रवेश फेरी – 23 ते 30 जून
नियमित तीसरी प्रवेश फेरी – 1 ते 9 जुलै
विशेष प्रवेश फेरी – 10 ते 18 जुलै

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button