भाळवणीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सामाजिक बांधिलकी जपत संस्थेची वाटचाल : बाजीराव पानमंद
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक यांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करुन हातभार लावण्याबरोबरच सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत संस्थेची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन गोरेश्वर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी केले.
संस्थेच्या वतीने भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून तालूका शिवसेना प्रमुख विकास रोहोकले, उपसरपंच इंजि. संदीप ठुबे, संस्थेचे व्हा. पोपटराव नांगरे, सोसायटीचे चेअरमन बाबुशेठ रोहोकले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे, सेवानिवृत्त शिक्षक देवराम गोडसे, भागुजी रोहोकले, नाना चेमटे, संभाजी
रोहोकले, संदीप रोहोकले, सुभाष रोहोकले, प्रकाश (पिनु ) रोहोकले, हरि चेमटे, शाळेचे मुख्याध्यापक आदि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुबे, अधिकारी जयराम तांबे, वसुली अधिकारी मच्छिद्र खरमाळे, सिनारे साहेब, शाखा व्यवस्थापक मंगल कळमकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.