राजुर महाविद्यालयात एम.कॉम.परिक्षेत निकिता पोखरकर सर्वप्रथम

राजूर प्रतिनिधी
:- नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात राजूर येथील सत्य निकेतन संस्थेच्या ॲड.मनोहरराव देशमुख महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेच्या एम.कॉम.परीक्षेत सौ.निकिता पोखरकर (भुसे) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांना 81 % मार्क्स मिळाले आहेत.द्वितीय क्रमांक अक्षय शेळके 78.94% तर तृतीय क्रमांक अश्विनी शेटे यांना 76.44 % गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
सौ.निकिता पोखरकर (भुसे)यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सौ.पोखरकर ह्या अगस्ती पतसंस्थेचे संचालक अक्षयदादा पोखरकर यांच्या पत्नी तर खरेदी विक्री संघाच्या संचालिका कृषीभूषण सौ.कुमुदिनीताई पोखरकर व शेतीमित्र सयाजीराव पोखरकर यांच्या त्या स्नुषा आहेत.
महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.एन.एम.देशमुख, सचिव टी.एन.कानवडे,प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख,कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.रेखा कढणे (वलवे),प्रा.भरत शेणकर,प्रा.सयाजी हांडे,प्रा. नितीन देशमुख,प्रा.वाळे, प्रा.काकडे,महिला पतसंस्थेच्या चेअरमन ॲड.मंगलाताई हांडे, निलिमाताई देशमुख यांनी विशेष अभिनंदन केले आहे.