शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष पदी श्री.गणेशभाऊ खंबरे यांची निवड

शेवगाव- शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली व या निवडणुकीत गणेशभाऊ खंबरे यांनी मोठ्या मताधिक्याने यश संपादन करत आपन खरे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवून दिले यानिमित्ताने दहीगाव ने येथील शेतकरी कुटुंबातील जागृत तरुणांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याचे औचित्य साधून गणेश खंबरे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रुप व शंभुराजे प्रतिष्ठान दहीगाव ने च्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला तसेच समस्त ग्रामस्थ दहिगाव ने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी या सत्कारास तुषार कोल्हे, गणेश मिसाळ,, रवी बाबरे अमोल मतकर ,रोहित फाटक ,सतीश हुलगे ,विठ्ठल कर्डिले ,श्याम सुंदर कर्डिले, भाऊ जाधव, राहुल हुलगे ,,सागर पवार दत्तू ताके, संभा निळ, सोमनाथ सटाले ,निलेश इंगळे, रोहन मोरे ,भारत बोरुडे ,संतोष खंडागळे महेश बाबरे, श्याम नजन ,संदीप गाढे, दत्तू सुडके, रवी खंबरे, शेखर अशोक सातदिवे, क्षीरसागर ,तसेच आदी.ग्रामस्थ उपस्थित होते.