इतर

किल्ले बनवा स्पर्धेत सोनाली व मोनाली जाधव भगिनींचा प्रथम क्रमांक 

लोणी काळभोर : “संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईल देण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड-माती, चिखल, काळी-तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड-किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित-संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे प्रत्यक्षात केलेल्या कृतीतूनच होईल.” असे प्रतिपादन पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गवळी यांनी केले.
ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त दरवर्षी गड-किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वेळी हवेली तालुक्यातील सुमारे २७८ पेक्षा जास्त तरुण-तरुणी या स्पर्धेत सहभागी झाले होते. आपआपल्या घराशेजारी, इमारतीखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. दुर्ग अभ्यासकांनी त्याचे परीक्षण केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार (२२ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य गवळी बोलत होते.
छत्रपती शिवरायांनी गडकिल्यांच्या सहाय्याने केलेल्या पराक्रमाची माहिती छोट्या मित्रांना बालपणातच मिळावी यासाठी गड किल्ले बनविण्याची स्पर्धा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली. या विषयी माहिती देताना अमित जगताप पुढे म्हणाले की दिवाळीचे औचित्य साधून दर वर्षी हि स्पर्धा लोणी काळभोर येथे घेण्यात आली. ग्रीन फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी दिवाळीत विविध किल्यांची प्रतिकृती साकारण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देण्यात आली होती. लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी व आपल्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी कन्या प्रशाला लोणी काळभोर मुख्याध्यापक संजिवनी बोरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाबाई वाळके, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर चे संचालक योगेश काळभोर, रत्नाबाई काळभोर, महिला दक्षता कमिटी अध्यक्ष संगीता काळभोर, ग्रीन फौंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रतीक कोळपे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष गहिनीनाथ राजे,राहुल कुंभार, किरण भोसले,शुभम जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत सोनाली जाधव व मोनाली जाधव यांनी प्रथम क्रमांक, शिवंभू जगताप यांनी दुसरा क्रमांक, शैलेश सोनवणे यांनी तिसरा क्रमांक, सिद्राममळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा चौथा क्रमांक , सिध्देश सागर पंडित पाचवा क्रमांक पटकावला. तसेच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या दोन्ही गावातील क्रीडा क्षेत्रात ज्या विद्यार्थीनी उल्लेखनीय कामगिरीकेली आहे अशा ३६८ विद्यार्थीचा क्रिडा पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकास एक फुटाचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून गेली ८ वर्षापासून किल्ले बनवा स्पर्धा राबविण्यात येत आहे २०१८ रोजी एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते .२०२४ मध्ये २७८ विद्यार्थी सहभागी झाले. दिवाळी सना निमित्त किल्ले बनवा च आयोजन ग्रीन फाउंडेशन करत असते २०२५ मध्ये हर घर किल्ला बांधण्यासाठी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी आवाहन केले. एक दिवस लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गाव दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होईल अशी अशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश खुळपे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button