हुशार विद्यार्थ्यांनो, ..आता पैशांअभावी शिक्षणात खंड नको.. करीअर घडवा.
.
उच्च शिक्षण पूर्ण करा, शैक्षणिक कर्जाद्वारे…
सोलापूर : १० वी नंतर प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी शासनाकडून शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) बँकाद्वारे उपलब्ध करुन देत आहे. घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. याची भिती विद्यार्थी किंवा पालकांनी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच केंद्र सरकारच्या वतीने शैक्षणिक कर्जावर ‘सबसिडी’ देण्यात येत असून सदर प्रकरण बँकेमार्फत पाठविल्यानंतर संबंधित खात्याकडून (केंद्र) मंजुरी झाल्यावर ‘सबसिडी’ मिळून कमी व्याज दर होतो. यासाठी ‘सबसिडी’ मिळण्यासाठी ‘फाईल’ पाठवण्यासाठी संबंधित बँकेकडेच आग्रह धरावे लागेल, अशी माहिती फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी दिले आहे.
पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्रीराम मंदिर येथे रविवार दि. ११ जून रोजी सकाळी १० वाजता माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली फौंडेशन यांच्या वतीने केले आहे. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. प्रशांत नाशिककर आणि मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ. रामदास सब्बन हे प्रमुख उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. माहिती, मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वच समाजातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, सदस्य किशोर व्यंकटगिरी यांनी केले आहे.
————————–