शेवगाव अंधमुक्त व्हिलेजचे काम अभिमानास्पद -शैलेजा राऊळ

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सामान्य नागरिकांमध्ये डोळ्यांच्या विकारांविषयी जनजागृती करून तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून नागरिक व महिलांना एकत्र करून पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल मध्ये डोळ्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून तालुक्यात अंधमुक्त व्हिलेज अभिमानास्पद काम करत आहे. असे मत शेवगाव पंचायत समितीच्या विस्तारअधिकारी शैलेजा राऊळ यांनी मांडले.
अंधमुक्त व्हिलेज शेवगाव तालुका, बुधराणी हॉस्पिटल पुणे, रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी, रोटरी प्रतिष्ठान शेवगाव व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर विद्यानगर शेवगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला शेवगाव येथे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर विद्यानगर येथे डोळ्याच्या रुग्णांची मोफत तपासणी करून महिन्याच्या चार व पाच तारखेला पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलला ऑपरेशन साठी पाठवलले जातात व त्यानंतर रुग्णांना घरपोच केले जाते. संपूर्ण कामाचे नियोजन शेवगाव तालुका अंधमुक्त व्हिलेज चेअरमन बाळासाहेब चौधरी हे करतात. नुकत्याच झालेल्या शिबिरात १०५ जणांची तपासणी करण्यात आली तर ३२रुग्णांना ऑपरेशन व पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी शैलेजा राऊळ यांनी रुग्णांशी हितगुज साधून त्यांची विचारपूस केली व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून शेवगाव तालुका अंधमुक्त व्हिलेज करत असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.
शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांमध्ये जाऊन अंधमुक्त व्हिलेजच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करून रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे. या पुढील काळातही हे काम असेच चालू राहील महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला शेवगाव शहरांमध्ये व तालुक्यातील ग्रामीण भागात दोन ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना एकत्र करून मोफत तपासणी व पुढील उपचार शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे पाठवले जाते.या माध्यमातून अनेक रुग्णा च्या डोळ्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे याचे समाधान वाटते.
बाळासाहेब चौधरी
अंधमुक्त व्हिलेज शेवगाव तालुका