अहिल्यानगर जिल्हा पदवीधर डीएड शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रंगनाथ मोरे बिनविरोध

सचिवपदी विजय विधाते तर
कार्याध्यक्षपदी शिवाजी गोर्डे यांची फेरनिवड

अकोले,दि.१६ ( प्रतिनिधी )
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा पदवीधर डीएड,कला, क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी रंगनाथ मोरे (कर्जत ) यांची तर सचिवपदी विजय विधाते (नेवासा) यांची सर्वानुमते बिनविरोध तर कार्याध्यक्षपदी शिवाजी गोर्डे (अकोले) यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
संघाच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत पुढील एक वर्षासाठी कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पदवीधर डीएड,कला क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष दिलीप आवारे हे होते.
यावेळी राज्य सचिव महादेव माने,राज्यकार्यकरिणी सदस्य मिलिंद काळपुंड,प्रकाश आरोटे,संघटन मंत्री नवनाथ टाव्हरे,विरेश नवले या मान्यवरांनी उपस्थित राहून उत्तम मार्गदर्शन केले.
या बैठकीत सन २०२४-२०२५ साठी बिनविरोध निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष : रंगनाथ मोरे ( कर्जत ), कार्याध्यक्ष : शिवाजी गोर्डे
( अकोले ) उपाध्यक्ष : डॉ. संजय उदमले ( पाथर्डी),नानासाहेब भोर ( संगमनेर ), शांताराम वाकळे ( अकोले ),संजय देशमुख
( अकोले ), सेक्रेटरी : विजय विधाते (नेवासा), सहसेक्रेटरी : अरुण शेलार ( कर्जत ),डॉ. वैभव लोंढे ( राहुरी ) ,गोकूळ ठाकूर ( राहुरी ) खजिनदार : शिवाजी गुंजाळ ( पारनेर ), सहखजिनदार : पोपट दिघे ( संगमनेर ), दिलीप धुमाळ (अकोले ) प्रसिद्धी प्रमुख : राजेंद्र चव्हाण ( पाथर्डी),समन्वयक डॉ. चंद्रशेखर पाटील ( शेवगाव ) तसेच यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडण्यात आलेले सदस्य पुढीलप्रमाणे:बाळासाहेब पिंगळे,मनोज भालेराव,हिवाळे,अकोलकर,नवनाथ महापुरे,
अशोक पलघडमल,सय्यद मुसा,सुनिल अहिरे,
बाळासाहेब जाधव,भाऊसाहेब घेलवडे,प्रकाश डोळस महिला आघाडी प्रमुख पदी : अंजली विधाते, श्रीपतवाड,कल्पना काळोखे,जगदाळे, मीनाक्षी सदाफुले, मनोरमा काटे,नंदा बिबवे,
महिला आघाडी समन्वयक : दुर्गा गायकवाड आणि संघटनेच्या प्रवक्तापदी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश आरोटे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
या सभेत संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष हनुमंत बोरे,जिल्हाध्यक्ष रामदास धनवडे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून बैठकीस प्रारंभ झाला.यावेळी पदवीधर डीएड शिक्षकांचा सेवाज्येष्ठतेचा लढा,राजपत्राप्रमाणे सेवाज्येष्ठता, न्यायालयीन लढा,पेंशन,संघटन व पुढील आंदोलनाची दिशा आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.सी.एम.पाटील यांनी ऑनलाईन मिटींगचे चांगले नियोजन करून टेक्निकल बाजू अतिशय उत्कृष्ट सांभाळली आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.अंजली विधाते यांनी स्वागत केले.रंगनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले.दुर्गा गायकवाड यांनी आभार मानले.