इतर
वन्यजीव विभागाने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साजरा केला पर्यावरण दिन !

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यावरण दिन पांजरे बेट गट नंबर 14 येथे साजरा करण्यात आला सदर ठिकाणी युवा परिवर्तन मंच चे अध्यक्ष विक्रम गायकवाड व त्यांचे मंचचे सदस्य यांनी वृक्षारोपण केले सदर ठिकाणी 135 उंच वृक्षांची लागवड करण्यात आली सदर कार्यक्रमास केतन पाटील आयपीएस मा.उज्वल चव्हाण आय आर एस मा. सागर खराडे प्रशिक्षणार्थी आयपीएस,सोहम मांढरे प्रशिक्षणार्थी आयएएस यांनी वृक्षारोपण केले तसेच सदर ठिकाणी उपस्थित सर्वांनी पर्यावरणाची शपथ घेतली सदर सदर कार्यक्रमात भंडारदरा व राजुर वनक्षेत्रातील सर्व कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण अकोले यांच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.यावेळी वनपरिक्षेत्र अमोल आडे व दत्तात्रय पडवळ याच्या उपस्थित पार पडला
