आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून साजरा केला चिमुरडीचा वाढदिवस !

भंडादरा/ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या मुतखेल या आदिवासी गावातील आश्रम शाळेतील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करत आपल्या चिमुरड्या मनस्वी चा वाढदिवस साजरा करण्यात आला डॉ. संदीप पर्वत यांचे शेंडी तालुका अकोले येथे ओम चैतन्य सेवा हॉस्पिटल आहे डॉक्टर संदीप पर्वत यांची कन्या कुमारी मनस्वी हिचा आज सातवा वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कोणताही अवाढव्य व अनावश्यक खर्च न करता आपण ज्या भागात राहतो त्या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले पाहिजे यासाठी डॉक्टर संदीप पर्वत यांनी मुतखेल येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये करून दिली त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे