रांजणी जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ?

शेवगाव दि ०१
शेवगाव तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकाम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे
रांजणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने दोन शाळा खोल्यांचे बांधकाम सुरू आहे परंतु ते बांधकाम अंदाजपत्रकाच्या निकषाप्रमाणे होत नसल्याने सदर कामावर होणारा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष शरद पाटील थोटे राम पाटील शिदोरे यांनी केली आहे
सदर काम निकृष्ट दर्जाचे काम सुरू असतानाही संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व स्थानिक स्कूल कमिटी ,पालक समिती चे या कामाकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी प्रमाणे काम करत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे


.
.