इतर

अकोले तहसिल कार्यालयात २८ डिसेंबर ला ग्राहक मेळावा.


अकोले (प्रतिनिधी)

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अकोले तहसिल कार्यालयामध्ये गुरुवार दि. २८/१२/२०२३ रोजी दुपारी १२.००वाजता ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली.


या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध क्षेत्रातील तक्रारींचे संबंधित अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे
अकोले तालुक्यात ग्राहक दिनी यापुर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अकोले हा आदिवासी व डोंगराळ तालुका आहे. तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहेत. अनेक शासकीय दाखले, रेशन पुरवठा, वीज पुरवठा, वीज बिले, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, शेतकरयांनसाठी बी – बियाणे, कृषी खते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुविधा, शिष्यवृत्ती, आदिवासी आश्रम शाळांमध्ये मिळणारी दर्जाहीन सुविधा , भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय , आधार, वनखाते, पंचायत समिती व कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, प्रकल्प कार्यालय राजूर, बाल विकास प्रकल्प, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक, एस टी बस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बँका, जीवन प्राधिकरण, वैद्यमापण शास्त्र, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर खात्यांच्या तक्रारींचे निराकरण या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात तहसीलदार सतिश थेटे , निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, महसूल नायब तहसीलदार गणेश भानावसे, पुरवठा निरीक्षक सातपुते, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, महेश नवले, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रुद्रे , प्रा. डॉ. सुनील शिंदे, ॲड दिपक शेटे, ॲड राम भांगरे, ॲड भाऊसाहेब वाळुंज, भाजप जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, माधवराव तिटमे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रमोद मंडलिक, नरेंद्र देशमुख, दत्ता ताजणे, कैलास तळेकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्राहकांनी मोठ्या संख्येने या ग्राहक दिनात उपस्थित राहावे असे आवाहन ग्राहक पंचायतच्या तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button