किसान कॉलेजचा अनोखा उपक्रम !१० हजार रूपयांमध्ये मिळनार प्रवेश

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक क्रांती घडवण्याचा उद्देश ठेवून तसेच गोरगरीब पालक व विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वाचा एक भाग होत , विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून किसान बहुउद्देशिय संस्थेच्या किसान पब्लिक स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजने २०० प्रवेशाचा टप्पा ओलांडला असून अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे.
दरम्यान, १० हजार रुपये फि मध्ये ११ वी १२ वी अभ्यासक्रम तसेच नीट, जेईई व सीईटी प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले .
नर्सरी ते १२ वी पर्यंतच्या वर्गांचे २०० प्रवेश पुर्ण झाले असून अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याचे चेडे म्हणाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी चंद्रकांत चेडे यांनी किसान बहुउद्देशिय संस्थेची स्थापना करून नर्सरी पासूनचे वर्ग सुरू केले. या शिक्षण संस्थेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येउन विद्यार्थ्यांना १२ वी नंतर विविध प्रवेश प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग होईल याची काळजी घेण्यत आली. परीणामी अल्पावधीत विद्यार्थी व पालकांची या शिक्षण संस्थेला पसंती मिळाली.
शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा असून शहरी भागात सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्याशी स्पर्धा करू शकत नव्हते. हीच अडचण लक्षात घेऊन चेडे यांनी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिल्याने या संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून उज्वल यश संपादन केले आहे.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवत अल्प फी मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस ठेवून शैक्षणिक संस्था चालवणारे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
:
दर्जेदार शैक्षणिक सुविधा !
किसान स्कुलमध्ये शहरी शिक्षण संस्थांप्रमाणे सर्व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी या स्कुलचे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करतात.या संस्थेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस चढता असून जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षण संस्था असा लौकिक या संस्थेने अल्पावधीत संपादन केला आहे.