कोतुळ सोसायटी निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी!

कोतुळ प्रतिनिधी
राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या कोतूळ येथील कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाचे निवडणूक सुरू झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे
संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठीउमेदवारी अर्ज भरणे ची प्रक्रिया सुरू असून आज बुधवार दुपारपर्यंत 32 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे उद्या गुरुवार (दि.12) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने उद्या सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे कोतुळ सोसायटीच्या १५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे
६ मे २०२२ ते १२ मे२०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे १३ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करणे ,१७ मे २०२२ रोजी वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे १७ मे ते ३१ मे २०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे ,
उमेदवारी अर्ज माघारीनंतर शिल्लक उमेदवाराना १जून २०२२ रोजी चिन्ह वाटप करणे ११ जून २०२२ रोजी सकाळी ८ ते दु ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदाना नंतर त्याच दिवशी दि११ जून २०२२ रोजी सायंकाळी मतमोजणी होणार आहे
सहकार अधिकारी ए एस शेख निवडणूक निर्णय अधिकारी म्हनून काम पाहत आहे
सर्वसाधारण आदिवासी कर्जदार प्रतिनिधी मतदार संघात सहा जागा, सर्वसाधारण बिगर आदिवासी मतदारसंघात चार जागा, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघात एक जागा, महिला आदिवासी प्रतिनिधी मतदार संघात दोन जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघात एक जागा ,भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग प्रतिनिधी मतदारसंघात एक जागा, अशा एकूण पंधरा जागांसाठी ११ जून २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे
इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पाहता निवडणूक बिनविरोध होण्याचे शक्यता धूसर आहे यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय खलबत सुरू आहेत