कान्हूर पठार येथे मुस्लिम बांधवाकडुन वारक-यांसाठी महाप्रसादाचे आयोजन

दत्ता ठुबे/ पारनेर:-
पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे संत निळोबाराय पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र कान्हूरपठार ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी काढण्यात आली.यावेळी कान्हूरपठार गावामध्ये सर्व जात समभाव एकोपा बघण्यात आला.
कान्हूरपठार येथील दिंडी निमित्त सर्व वारकऱ्यांना कान्हूरपठार येथील निजामभाई सय्यद भाई इनामदार हे पाच वर्षापासून दिंडीची पंगत देत असतात. या वर्षी देखील दिंडी निमित्त पंगतीचे आयोजन तसेच वारकऱ्यांसाठी 25 थंड पाण्याचे जार कायमस्वरूपी निजामभाई यांच्याकडून देण्यात आले.यावेळी गावकऱ्यांकडून निजामभाई यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये सध्या जाती धर्माविषयी मोर्चे चालू आहेत परंतु आज येथे पाच वर्षापासून दिंडीनिमित्त पंगत मुस्लिम बांधव देत असतात.
कुठलाही सण उत्सव असेल तर हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात.
असाच एकोपा राहावा यासाठी काही ग्रामस्थ पंढरपूर या ठिकाणी प्रार्थना करणार आहे.
यावेळी सरपंच गोकुळ काकडे, उपसरपंच सागर व्यवहारे, आयनु इनामदार, पांडुरंग मंदिराचे अध्यक्ष भाऊसाहेब दमडे, राज मोहम्मद इनामदार, दमा ठूबे,काशिनाथ ठुबे,फिरोज इनामदार, शौकत इनामदार, सादिक इनामदार, नियाज इनामदार,रमेश सोनावळे, इसुफ इनामदार, संदीप ठुबे,तसेच सर्व मुस्लिम व हिंदू बांधव यांची उपस्थिती होती.