सभापती डॉ.घुले यांच्याकडून मडके कुटुंबियांचे सांत्वन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र मडके यांच्या मातोश्री कै. सौ. राधाबाई रायभान मडके यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,
शहरटाकळी या ठिकाणी पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांनी मडके कुटुंबीयांची भेट घेवुन या दु:खात सहभागी होऊन कै.सौ. राधाबाई मडके यांना भावपुर्ण श्रद्धाजंली अर्पण केली, मडके कुटुंबांला या दुखातुन सावरण्यासाठी शक्ती मिळो,ही परमेश्वर चरणी प्रार्थना केली, यावेळी विलास लोखंडे, सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष शेटे , ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण , रामकृष्ण गोरे , भाऊसाहेब मडके, राजेंद्र काकडे,काकासाहेब मडके, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम ,ॲड महेश आमले ,मेजर रमेश नरवडे, शेखर जोशी तसेच मडके परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.