निवृत्ती महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत उंचखडक येथे श्री सद्गुरू यशवंतबाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न..!!

अकोले : गुरुवार दि.१५ जुन २०२३ रोजी अकोले तालुक्यातील अध्यात्मिक व धार्मिक परंपरा असलेल्या उंचखडक बुद्रुक येथे सालाबादप्रमाणे असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी,ह.भ.प.मनोहरबाबा भोर,ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू यशवंतबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य समस्त बेलदार समाज पायी दिंडी घेऊन या पावन भूमीत येत बाबांची मनोभावे सेवा करतात, सोहळ्याच्या दिवशी गावकरी व समस्त बेलदार समाज मिळुन यशवंतबाबांच्या पालखीची महिलांनी डोक्यावर तुळश्रीवृंदावन घेत उंचखडक गावातुन दिंडी प्रदक्षिणा काढली व हनुमान मंदिरासमोर हरी नामाचा गजर करत लहान थोर मोठ्यांनी फुगडी खेळत आनंद लुटला.या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र भुषण ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे प्रबोधनपर काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर समस्त बेलदार समाजाने मिळुन महाप्रसादाचे आयोजन केले होते. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी उपस्थितांचे श्री सद्गुरू यशवंतबाबा धार्मिक ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी उंचखडक गावचे सुपुत्र शिवव्याख्याते पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक श्री.एस झेड देशमुखसर(सोपानकाका), अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन सुनिताताई भांगरे,श्री सद्गुरू यशवंतबाबा धार्मिक ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोकराव देशमुख,श्री सद्गुरू यशवंतबाबा धार्मिक ट्रस्टचे सरचिटणीस योगी केशवबाबा चौधरी,विश्वस्त विठ्ठलपंत गोंडे महाराज,तुकारामबाबा देशमुख प्रतापराव देशमुख, भाऊसाहेब खरात,हिंमतराव मोहिते,दिलीपराव मंडलिक, देवराम पाटील शिंदे,भरतराव देशमुख आदी विश्वस्त,ग्रामस्थ, तालुक्यातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उंचखडक बुद्रुक गावचे कार्यक्षम माजी सरपंच विद्यमान उपसरपंच तथा बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक महिपाल देशमुख (बबनराव) यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ भावीक भक्त उपस्थित होते.
