उत्पादन शुल्क दारूबंदी, वनरक्षक ,तलाठी भरती परीक्षा शुल्क कमी करा मखयंत्रयांकडे केली मागणी

संभाजीनगर प्रतिनिधी
: राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी, वनरक्षक आणि तलाठी भरतीची परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे
दारूबंदी, वनरक्षक, तलाठी भरती प्रक्रिया सुरू केल्या त्याबद्दल स्वागत आहेब पण तिन्ही भरतीची परीक्षा शुल्क हे प्रत्येकी अमागास प्रवर्ग (Open)800 ते 1000 व मागास प्रवर्ग(cast) 700 ते 800, सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले असून ते सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहराकडे आलेले आहेत त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत असते आणि त्यांचे वडिलांचे उत्पन्न सुद्धा रोजगारासाठी पुरेसे नाही त्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी अडचण होत आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप कठोर परिश्रम करीत आहे आणि शैक्षणिक प्रगती सूनिश्चित करण्यासाठी ते आपले जीवाचे रान करत आहे,
परीक्षा शुल्क मध्ये थोडी शिथिलता द्या, हा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि सर्वांच्या भविष्यासाठी निर्णय महत्त्वाचा ठरेल आपण सर्वसामान्यांना विद्यार्थ्यांचे संकट समजून घ्या विद्यार्थ्यांना तातडीने ही सवलत द्या . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक भाषणांमध्ये बोलतात हे सरकार मायबाप जनतेचे ,सर्वसामान्यांचे, कष्टकरी रोजगार, शेतकऱ्यांचे सरकार आहे म्हणूनच आम्ही ही विनंती करतो असे संभाजीनगर फुलंब्री.युवा सेना जिल्हा चिटणीस: पुरुषोत्तम सुनील मोरे यांनी केली आहे