भाळवणी येथील जि. प.शाळेत गुणवंत विदयार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने
नगरसेवक विशालभाऊ शिंदे यांचा सामाजिक उपक्रम
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी :
-पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील जि. प . प्रा . शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनाचा शालेय साहित्य देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला गुरुवारी दि .15 रोजी महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेर नगरपालिकाचे नगरसेवक यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाळवणी येथील जि. प. प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना नगरसेवक विशालभाऊ शिंदे म्हणाले की या पुढील काळात भाळवणी येथील जि. प. शाळेतील राहीलेल्या सर्व टॉयलेट व इतर कामाचे आश्वासन दिले तसेच शिक्षकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विशालभाऊ शिंदे , अधिकारी श्री . गेणुजी नरसाळे जि.प.प्रा शाळा भाळवणीचे मुख्याध्यापक श्री आबुज सर , दतात्रय सिनारे सर , मते सर , दरेकर सर, शिदे मॅडम , रोहोकले मॅडम , निलम सुंबे मॅडम, रोहकले सर साळवे सर,वाघ सर,अंबादास तांबे, आबासाहेब चेमटे , मयुर पंधारे,अनिल ईधापे व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मते सर तर आभार प्रदर्शन तांबे सर यांनी मानले.
