अगस्ती महाविद्यालयाच्या प्रा.रोहिणी डावरे छत्तीसगढ मध्ये ‘ संस्कार श्री ‘ ने सन्मानित!

अकोले प्रतिनिधी-
दि. 16 व 17 जून रोजी विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयागराज, उ.प्र. व स्वामी स्वरूपानंद महाविद्यालय, हुडको भिलाई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या द्विदिवसीय राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनामधे प्रा.रोहिणी डावरे यांना मॅट्स विद्यापीठाचे कुलगुरू,डाॅ.के.पी. यादव व डाॅ. जयंतीप्रसाद नौटियाल, राजभाषा अध्यक्ष देहरादून, तसेच न्यायमूर्ती चंद्रशेखर बाजपेयी व डाॅ. विनयकुमार पाठक, पूर्व राजभाषा अध्यक्ष छ.ग. यांच्या हस्ते ‘ संस्कार श्री ‘ ने सन्मानित करण्यात आले आहे.
विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयागराज, उ.प्र. च्या वतीने घेण्यात आलेल्या संस्कारश्री स्टेटस स्पर्धेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकूण तीन फेर्यांमध्ये घेण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय संस्कार, संस्कृती वर आधारित होती.या तीनही फेर्यांमधून प्रा.रोहिणी डावरे ह्या प्रथम क्रमांकावर असून त्या संस्कारश्री सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत.
तसेच संस्थानच्या वतीने घेण्यात येणारे विभिन्न राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, काव्यसंमेलन इ.चे आॅनलाईन संचालन करणार्या विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थानच्या एकूण चार सूत्रसंचालकांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकीसाठी विश्व हिंदी संस्थानचे विभिन्न राज्यांमधील सदस्यांनी प्रा. रोहिणी डावरे यांना पसंती क्र.१ देवून ५३ मतांनी विजयी केले आहे. त्याबद्दल संस्थान च्या वतीने त्यांना संस्कारश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल अकोले तालुका एज्यु.सोसा. चे अध्यक्ष मा. दातीर साहेब, सचिव, मा. सुधाकरराव देशमुख, महाविद्यलयाचे प्राचार्य डाॅ. भास्कर शेळके, उपप्राचार्य, डाॅ. संजय ताकटे, पर्यवेक्षक प्रा.तान्हाजी जाधव तसेच विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान चे अध्यक्ष, डाॅ.शहाबुद्दीन शेख, उपाध्यक्ष, डाॅ.ओमप्रकाश त्रिपाठी सचिव डाॅ. गोकुलेश्वर कुमार द्विवेदी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.