दहीगाव-ने ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनाची ओढ, मुखी हरिनामाचा बहर,संगे टाळ-मृदंगाचा गजर अशा भारवलेल्या वातावरणात शनिवार दि.१६ दध्नेश्वर शिवालयातून पालखी सोहळ्याचे भाविनिमगाव,शहरटाकळी,देवटाकळी येथे आगमन झाले.ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पालखीचे स्वागत केले.दरवर्षी मोठ्या उत्साहात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने दध्नेश्वर शिवालयातून जाणारा पायी दिंडी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला.दहीगाव-ने (ता.शेवगाव) ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे २२ वे वर्ष असून दहिगाव-नेसह पंचक्रोशीतील गावांतील भाविक मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यात यंदा सामील झाले आहेत.
वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांनी सुरु केलेल्या दिंडी पालखीच्या दर्शनासाठी यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती.भावीनिमगाव येथील आनंद साधकाश्रमात,दहिगाव-ने येथे रेणुका मंगल कार्यालयात,शहरटाकळी येथे वडार समाज बांधवांच्या वतीने दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.तर देवटाकळी येथे लिट्ल स्टार शाळेमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
भावीनिमगाव येथे दिंडी चालक गुरुदास नवनाथ महाराज काळे,सिताराम महाराज चेडे,विणेकरी वामनराव महाराज बडे यांचा स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर,सरपंच आबासाहेब काळे,प्रा भागवत जरे यांनी भावीनिमगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला.दहिगाव-ने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी औषधी किटचे वितरण केले.
शहरटाकळी येथे सनई चौघडा व ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले.शिंदे (वडार समाज) परिवाराच्या वतीने यंदाही महाप्रसाद वाटप करण्यात आले.शहरटाकळी येथील चंद्रकांत कुंडलिक जगताप यांनी यावेळी वारकऱ्यांना ६०० बॅगचे वाटप करण्यात आले.देवटाकळी येथील लिट्ल स्टार इंग्लिश मेडीयम शाळेत आतनूर साहेबांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.मृदंगाचार्य पांडुरंग महाराज पानकर,नवनाथ महाराज मगर,मोहन महाराज खंडागळे,गोविंद कावळे,निलेश महाराज नेव्हल,गोरक्ष महाराज मिर्झे,ज्ञानेश्वर काळे,अनिकेत गोसावी,दादा गर्जे,शिवाजीराव जाधव,भाऊसाहेब पवार,पुंजाराम घोडके,भीमा सकुंडे,रामचंद्र गिरम,सतीष मगर, नानासाहेब गोरे, परमेश्वर गावंडे,शेषराव आपशेटे,श्रीराम चव्हाण,साबळे सर,नारायण काळे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमोल पानकर यांनी काढलेल्या पांडुरंगाच्या रांगोळीचे सर्वांनीच कौतुक केले.
